Hot Posts

6/recent/ticker-posts

महापालिका मालमत्ता कर विभागाने

 महापालिका मालमत्ता कर विभागाने



अवघ्या तीन महिन्यात केली ६० कोटींची विक्रमी वसुली

उद्दिष्टापेक्षा जास्त वसूल करण्याची कर विभागाची कामगिरी

सोलापूर (कटूसत्य वृत्त):-    अचूक नियोजनाच्या जोरावर महानगरपालिकेच्या मिळकतकर विभागाने अवघ्या तीन महिन्यात ६० कोटींची विक्रमी वसुली केली. उद्दिष्टापेक्षा जास्त वसुली करण्याची किमया कर विभागाने साधल्याने महापालिका आयुक्तांनी मालमत्ता कर विभागाचे उपायुक्त आशिष लोकरे, अधीक्षक युवराज गाडेकर आणि त्यांच्या संपूर्ण विभागाचे कौतुक केले. महापालिका आयुक्तांनी विभागाला दिलेले ३ महिन्यात ४८ कोटींचे उद्दिष्ट ओलांडत ही उल्लेखनीय कामगिरी केली आहे.

मिळकतकराच्या रूपाने महापालिकेला मोठा महसूल प्राप्त होतो. त्यामुळे प्रशासनाने मिळकतकर वसुलीवर विशेष लक्ष केंद्रित केले आहे. शहरातील एकूण ४९ हजार २४९ मिळकतदारांनी ५७ कोटी ७८ लाख ३४ हजार ४५४ रुपयांचा कर महापालिकेच्या तिजोरीत जमा केला. यामध्ये २९ हजार ८९

मिळकतदारांनी २७ कोटी २८ लाख रुपयांचा मिळकत कर हा ऑनलाइन पद्धतीने महापालिकेत जमा केला.

यामध्ये १४०२ मिळकतदारांनी ५ कोटी ७९ लाखाचे धनादेश दिले होते. शिवाय एमआयडीसी भागातील

मिळकतदारांनीही पाण्याचे सुमारे ३ कोटी रुपये महापालिकेच्या तिजोरीत जमा केले आहे.

वसुली मोहिमेच्या यशस्वी अंमलबजावणीसाठी महापालिका आयुक्त डॉ. सचिन ओम्बासे यांच्या आदेशानुसार उपायुक्त आशिष लोकरे यांच्या मार्गदर्शनाखाली प्रयत्न करण्यात आले. कर वसुली कार्यवाहीस गती देताना क्षेत्रीय पातळीवर कर निर्धारण, थकबाकीदारांना नोटीस बजावणे,

डिजिटल माध्यमांचा वापर करून आठवणी निर्देश पाठवणे व थेट संवाद साधणे या विविध माध्यमांचा

प्रभावी वापर करण्यात आला.

महानगरपालिका आगामी काळात अधिकाधिक नागरिकांना कर भरण्यास प्रवृत्त करण्यासाठी

जनजागृती मोहिम राबविणार असून, थकीत कर वसुली, नव्या मालमत्तांची नोंदणी व कर निर्धारण

प्रक्रियाही अधिक गतिमान करण्यात येणार आहे.


...चौकट...

आयुक्तांनी केले मालमत्ता कर टीमचे अभिनंदन

मिळकत कर वसुली मोहिमे संदर्भातील यशस्वी अंमलबजावणीत उपायुक्त आशिष लोकरे यांच्या नेतृत्वाखाली मिळकतकर विभागाने अत्यंत योजनाबद्ध पद्धतीने कार्य केले. यामुळे विभागप्रमुख युवराज गाडेकर, कर निरीक्षक, कार्यालयीन कर्मचारी, संगणक प्रणालीसंबंधित कर्मचाऱ्यांचे मोलाचे योगदान लाभले. आयुक्तानी या कामगिरीचे कौतुक करताना मालमत्ता कर वसुलीतील ही आकडेवारी महापालिकेसाठी आर्थिकदृष्ट्या नव्हे तर कार्यपद्धतीच्या दृष्टीनेही एक मैलाचा दगड आहे. हीच ऊर्जा

पुढील महिन्यांमध्येही टिकवून ठेवणे आवश्यक असल्याचे सांगितले. '

Reactions

Post a Comment

0 Comments