Hot Posts

6/recent/ticker-posts

प्रभाग १० मधून भाजपचे मेजर तानाजी माने यांच्याच जनसंपर्काची सर्वाधिक चर्चा

 प्रभाग १० मधून भाजपचे मेजर तानाजी माने यांच्याच जनसंपर्काची सर्वाधिक चर्चा




भाजपच्या बालेकिल्ल्यातून निवडणूक लढविण्याचा माजी सैनिक बांधवास मिळणार सन्मान

निवडणुकपुर्व वातावरण निर्मितीत अफाट गतीमान जनसंपर्काद्वारे संपर्क यंत्रणा सक्रीय करण्यात माने परिवारच आघाडीवर

मोहोळ (साहिल शेख):- प्रभाग क्रमांक दहा मधून भारतीय जनता पक्षाकडून उमेदवारीसाठी जरी अनेक जणांची नावे चर्चेत असली तरी खुल्या प्रवर्गातून मेजर तानाजी माने यांच्याच नावाला हिरवा कंदील मिळण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे. पक्षश्रेष्ठी आणि पदाधिकाऱ्यांच्या गोटातून देशसेवेत असलेल्या माजी सैनिक महोदयांना नगरपरिषदेसारख्या विकाससेवेची निगडित असलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थेचे प्रतिनिधित्व म्हणजे नगरसेवक पद मिळावे अशी भावना असणे स्वाभाविक आहे. प्रभाग क्रमांक दहा मधून उमेदवारीची चर्चा जरी सातत्याने होत असली तरी केवळ चर्चेत राहणं पसंत नसलेल्या माने परिवारातील सदस्यांनी या प्रभागातील घर ना घर पिंजून काढत प्रत्येकाशी जनसंपर्क सुरू केला आहे.

 भाजप नेते तथा पक्षश्रेष्ठी माजी आमदार राजन पाटील यांच्याशी एकनिष्ठ असलेले आणि भारतीय जनता पक्षाची धुरा प्रामाणिकपणे तळागाळापर्यंत पोहोचवण्यासाठी प्रयत्नशील असलेले मेजर तानाजी माने यांचे सुपुत्र डॉ. किरण माने यांनी सर्व प्रभागात फिरून नागरिकांकडून विविध अडीअडचणी जाणून घेतल्या. राज्याचे ग्रामविकास तथा पंचायतराज विभागाचे कॅबिनेट मंत्री आणि पालकमंत्री तथा निवडणूक जिल्हा प्रभारी ना. जयकुमारभाऊ गोरे, निवडणूक प्रमुख माजी आमदार राम सातपुते, भाजपचे जिल्ह्याचे नेते आ.सचिनदादा कल्याणशेट्टी, ज्येष्ठ नेते माजी आमदार राजन पाटील जिल्हाध्यक्ष शशिकांतनाना चव्हाण, लोकनेते शुगरचे चेअरमन बाळराजे पाटील सिनेट सदस्य अजिंक्यराणा पाटील, तालुकाध्यक्ष सतीशआप्पा काळे, निवडणूक प्रभारी सुशील भैय्या क्षीरसागर यांच्याशीही माने परिवाराचा सातत्याने संपर्क आणि मार्गदर्शन सत्र सुरू आहे. उमेदवारी प्राप्त करण्याच्या शर्यतीत माने परिवार सर्वात पुढे आहे.आरक्षण सोडती पासूनच प्रभागातून निवडणुकीत लढवण्याच्या चर्चेत प्रथम क्रमांकावर असलेले मेजर तानाजी माने हे जनसंपर्काच्या बाबतीत आत्तापर्यंत अव्वल स्थानावरच आहेत. त्यामुळे त्यांच्या उमेदवारीबाबत निश्चितपणे पक्षस्तरावरून सकारात्मक हालचाली सुरू असून त्यांनाच या प्रभागातून उमेदवारी मिळण्याचे दाट शक्यता आहे.

चौकट
कोण आहेत मेजर तानाजी माने...

मेजर तानाजी माने हे एव्हीएस दुध उद्योग समूहाचे डॉ. किरण माने यांचे वडील आहेत.
गेल्या अनेक वर्षापासून या प्रभागातील मूळ रहिवासी असल्यामुळे कुरुल रोड परिसराच्या पूर्व आणि दक्षिण भागात या माने परिवाराचा मोठा जनसंपर्क आहे. शिवाय पशुवैद्यकीय सेवेत असलेले युवा नेते डॉ. किरण माने हे देखील या प्रभागाशी गेल्या अनेक वर्षापासून निगडित असलेले व्यक्तिमत्व आहे. प्रत्येक सर्वसामान्यांच्या मदतीला धावून जाण्याची माने परिवाराची भूमिका या निवडणुकीत उमेदवारीच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाची बाब म्हणावी लागेल. दुग्ध व्यवसायाच्या निमित्ताने प्रत्येक शेतकरी आणि दुग्ध उत्पादकांशी यांची अतूट नाळ जुळलेली आहे. एव्हीएस उद्योग समूहाच्या प्रत्येक कार्यक्रमासाठी माजी आमदार तथा भाजपचे ज्येष्ठ नेते राजन पाटील हे आवर्जून उपस्थित असतात. त्यामुळे पाटील परिवाराशी एकनिष्ठ असलेल्या आणि भाजपा सोबत सातत्याने अंत्यत प्रामाणिक राहणाऱ्या माने परिवाराचे मेजर तानाजी माने हे आधारस्तंभ आणि कुटुंब प्रमुख आहेत.

चौकट
यापूर्वीचा प्रभाग १६ आणि १७ चा मिळून प्रभाग १० झाला आहे प्रभाग १६ चे प्रतिनिधित्व भाजपचे युवा नेते तथा विद्यमान नगरसेवक सुशील भैय्या क्षीरसागर यांनी केले आहे. सुशील भैय्या क्षीरसागर यांच्या कालावधीत या प्रभागात विक्रमी कामे झाले आहेत. त्यामुळे प्रभागातील सर्वसामान्य जनता भारतीय जनता पक्षाशी यापूर्वीही एकनिष्ठ होती आणि आताही आहे. कारण या प्रभागात रस्ते पाणी आरोग्य विषयक समस्या सातत्याने सोडवण्यासाठी भाजपाने प्रयत्न केला आहे. त्यामुळे भाजपाकडूनच मेजर तानाजी माने यांची उमेदवारी ही अत्यंत सकारात्मक बाब म्हणावी लागेल.

Reactions

Post a Comment

0 Comments