Hot Posts

6/recent/ticker-posts

भूमिपुत्र दौलतराव तथा बंडू देशमुख यांच्या उमेदवारीचा मुद्दा दिग्गज उमेदवारांना ठरणार मारक

 भूमिपुत्र दौलतराव तथा बंडू देशमुख यांच्या उमेदवारीचा मुद्दा दिग्गज उमेदवारांना ठरणार मारक



शिवसेनेच्या धनुष्यबाण चिन्हावर निवडणूक लढवण्याचे संकेत

प्रत्येकाच्या हाकेला धावून जाणारा प्रभागाचा आपला माणूस म्हणून ओळख मिळवण्यात
दौलतराव बंडू देशमुख यशस्वी

मोहोळ (कटूसत्य वृत्त):- मोहोळ शहराच्या पश्चिम भागातील प्रभाग क्रमांक आठ मधून निवडणुकीत यापूर्वीपासूनच आपले संघटनात्मक कौशल्य दाखवून देणाऱ्या दौलतराव तथा बंडू देशमुख यांनी आपला जनसंपर्क मोठ्या प्रमाणात वाढवला आहे. मात्र दौलतराव तथा बंडू देशमुख हे कोणत्या पक्षाकडून निवडणूक लढवणार ? याबाबत अनेकांना उत्सुकता होतीच. मात्र आता ते शिवसेना शिंदे गटाच्या धनुष्यबाण चिन्हावर निवडणूक लढवणार असल्याची प्राथमिक माहिती आहे. याबाबत लवकरच दौलतराव देशमुख म्हणजे बंडू देशमुख हे आपला निर्णय जाहीर करणार असून ते पूर्ण ताकदीनिशी या प्रभागातून निवडणूक लढवणार असल्याचे आता स्पष्ट झाले आहे.
यापूर्वीचा प्रभाग क्रमांक १२ आणि प्रभाग क्रमांक १३ असा मिळून तयार झालेल्या प्रभाग क्रमांक आठ मध्ये मोठी राजकीय उलथापालथ होण्याची चिन्हे आहेत. कारण या प्रभागाची सामाजिक संरचना आणि पक्षीय धोरण याचा अनेक उमेदवारांना नक्कीच सुप्त फटका बसण्याची चिन्हे आहेत. शिवाय शिवसेना शिंदे गटाचा धनुष्यबाण यापूर्वीपासूनच या प्रभागातील लोकप्रिय चिन्ह असल्यामुळे हेच चिन्ह घेऊन दौलतराव तथा बंडू देशमुख निवडणूक लढवणार आहेत. त्यामुळे ते निश्चितपणे या प्रभागातील मतदारांना शिवसैनिकांना निश्चितपणे आपलेसे आणि विकासासाठी झटणारे व्यक्तिमत्व वाटत आहेत.

चौकट
दौलतराव तथा बंडू देशमुख हे मोहोळ शहरातील गेल्या दीड दशकापासूनचे कुशल युवा संघटक आणि लोकप्रिय व्यक्तिमत्व म्हणून सर्वांना परिचित आहेत. वास्तविक पाहता प्रभाग क्रमांक आठ हा बंडू देशमुख यांचा स्वतः रहिवाशी असलेला प्रभाग आहे. त्यामुळे स्थानिक उमेदवारीच्या महत्त्वपूर्ण मुद्द्यावरच बंडू देशमुख यांनी या प्रभागातून निवडणूकीच्या अगोदरपासूनच संपर्काच्या मोर्चेबांधणीला प्रारंभ केला आहे. या प्रभागात त्यांनी शासन स्तरावर पाठपुरावा करत अनेक विकासकामे पूर्ण केली आहेत. तसेच या प्रभागातील सर्वांच्या हाकेला धावून जाणारा आपला जिवाभावाचा माणूस म्हणून देशमुख यांनी निर्माण केलेली ओळखच त्यांना या निवडणुकीतील विजया पर्यंत सहजरित्या घेऊन जाणार आहे.
Reactions

Post a Comment

0 Comments