प्रभाग नऊ मधून स्थानिक उमेदवारीच्या महत्त्वपूर्ण मुद्द्यावर धनुष्यबाण चिन्हावर लखनभाऊ कोळी लढवणार निवडणूक
शिवसेनेचे ओबीसी विभागाचे राज्याचे नेते तथा प्रथम नगराध्यक्ष रमेश बारसकर यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाप्रमुख चरणराज चवरे यांच्या उपस्थितीत केला प्रवेश
मोहोळ (कटूसत्य वृत्त):- गेल्या दहा वर्षापासून मोहोळ शहराच्या हद्दवाढ भागातील प्रभाग क्रमांक नऊ मधून निवडणूक लढविण्यासाठी सातत्याने चर्चेत असलेले युवा नेते लखन कोळी हे आता शिवसेना शिंदे गटाकडून धनुष्यबाण चिन्ह घेऊन निवडणूक लढवणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अनाथांचे नाथ ठरलेले ना.एकनाथ शिंदे, जेष्ठ मंत्री भरतशेठ गोगावले, आमदार राजू खरे, मोहोळचे प्रथम नगराध्यक्ष तथा ओबीसी विभागाचे राज्याचे नेते रमेश बारसकर, जिल्हाप्रमुख चरणराज चवरे
यांच्या नेतृत्वाखाली लखन कोळी यांनी काल शिवसेनेत प्रवेश करून शिवधनुष्य हातात उचलले आहे. ते याच प्रभाग क्रमांक ९मधुन निवडणूक लढवणार असल्यामुळे या प्रभागातील राजकीय समीकरणे आता गतिमान होताना दिसत आहेत.
यापूर्वीचा प्रभाग क्रमांक १४ आणि प्रभाग क्रमांक १५ असे मिळून नव्याने तयार झालेल्या प्रभाग नऊ मधील अनेक प्रश्न गेल्या अनेक वर्षापासून प्रलंबित आहेत. या प्रभागात विकास कामे कमी आणि ठेकेदारी जास्त झाल्याचे सर्वांना जाणवले. त्यामुळे दहा वर्षांपूर्वी जसा हा प्रभाग बकाल होता तसाच आजही आहे अशी स्थानिकांची भावना आहे त्यामुळे स्थानिक उमेदवारीच या प्रभागाला न्याय देऊ शकते ही बाब ध्यानात घेऊन लखन कोळी यांनी प्रथम नगराध्यक्ष रमेश बारसकर यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना पक्षाकडून धनुष्यबाण चिन्हावर निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला आहे.
चौकट
लखनभाऊ कोळी यांचा काल जिल्हाप्रमुख चरण राज चौरे प्रथम नगराध्यक्ष रमेश बारसकर यांच्या नेतृत्वाखाली प्रवेश झाला असून यापूर्वीपासूनच ते प्रभागातील विविध उपक्रमात सहभागी होऊन आजोड जनसंपर्काद्वारे मोठ्या प्रमाणात सक्रिय आहेत. त्यामुळे लखन कोळी यांची स्थानिक उमेदवारी या प्रभागात मोठी राजकीय उलथापालथ घडवणार आहे हे मात्र नक्की.
चौकट
मोहोळ शहरातील सर्वाधिक दाट लोकवस्तीचा आणि सर्वसामान्यांचा कष्टकऱ्यांचा हा प्रभाग आहे. त्यामुळे अनेक विकासकामांपासून वंचित असलेल्या या भागास न्याय देण्यासाठीच लखन कोळी हे निवडणुकीच्या रिंगणात उतरले होते. सामाजिक क्षेत्रात सातत्याने कार्यरत असलेला हा युवा चेहरा कोणत्या पक्षाकडून निवडणूक लढवणार याबाबत सर्वसामान्यांना उत्सुकता होतीच. मात्र दोन दिवसापूर्वी झालेल्या राजकीय घडामोडीमध्ये मोहोळचे प्रथम नगराध्यक्ष रमेश बारसकर यांचे नेतृत्व स्वीकारत शिवसेनेत प्रवेश करत लखनभाऊ कोळी यांनी हातात शिवधनुष्य घेऊन ही निवडणूक धनुष्यबाण चिन्हावर लढवण्याचा निर्णय घेतला आहे.

0 Comments