Hot Posts

6/recent/ticker-posts

प्रभाग चार मधून ज्येष्ठ नेते राजन पाटील यांच्या नेतृत्वाखाली मुस्ताकभाई शेख यांच्या परिवारातील उमेदवारी होणार फायनल

 प्रभाग चार मधून ज्येष्ठ नेते राजन पाटील यांच्या नेतृत्वाखाली मुस्ताकभाई शेख यांच्या परिवारातील उमेदवारी होणार फायनल




प्रभागाचा सर्वांगीण चेहरा मोहरा बदलण्यामध्ये मुस्ताकभाई शेख यांचा सिंहाचा वाटा

मोहोळ (साहिल शेख):- नगरपरिषदेच्या स्थापनेपासून सातत्याने फक्त विकास आणि विकासाची चर्चा होत असणाऱ्या प्रभाग क्रमांक चार मधून आता ज्येष्ठ भाजप नेते माजी आमदार राजन पाटील यांच्या नेतृत्वाखाली यापूर्वीचे स्वीकृत नगरसेवक म्हणून जबाबदारी पार पाडणारे मोहोळ शहरातील विकासप्रिय नगरसेवक मुस्ताकभाई शेख यांच्या परिवारातील सदस्य आता निवडणूक लढवणार असल्याचे खात्रीलायक वृत्त हाती येत आहे.

राजकीय दृष्ट्या महत्त्वाच्या असलेल्या मोहोळ शहराच्या पूर्वेकडील भागातील यापूर्वीचा जुना प्रभाग क्रमांक सहा आणि प्रभाग क्रमांक सातचा भाग समाविष्ट होऊन नव्याने निर्माण झालेल्या प्रभाग क्रमांक चारची निर्मिती झाली आहे. यापूर्वी प्रभाग क्रमांक सहाचे प्रतिनिधित्व जेष्ठ नेते  राजन पाटील यांच्या नेतृत्व आणि मार्गदर्शनाखाली दत्तात्रय खवळे यांनी तर प्रभाग क्रमांक सातचे प्रतिनिधित्व मुस्ताकभाई शेख यांच्या सहकार्य समन्वयातून नगरसेविका तथा माजी नगराध्यक्ष शाहीन शेख यांनी केले आहे. या प्रभागाचा सर्वांगीण चेहरा मोहरा बदलण्यामध्ये मुस्ताकभाई शेख यांचा वाटा सिंहाचा ठरला आहे हे कोणीही नाकारत नाही. मोहोळ नगरपरिषदेमध्ये गेल्या दहा वर्षापासून अतिशय शांत स्वभावाने सर्वांचे मन जिंकणारे अजातशत्रू व्यक्तिमत्व म्हणून मुस्ताकभाई शेख यांच्याकडे पाहिले जाते.


चौकट
 राजकीय क्षेत्रात पदार्पण केल्यापासून आजतागायत कधीही त्यांनी कोणावर कडवे टीकास्त्र सोडले नाही ना कधी आकस भावनेने कोणाला राजकारणात विरोध केला नाही. जे काही राजकारण केले आहे ते खेळीमेळीत आणि प्रांजळ भावनेने केले आहे. त्यामुळे संपूर्ण शहराच्या राजकारणात एक सर्वसमावेशक आणि मनमिळाऊ व्यक्तिमत्व म्हणून ते परिचित आहेत.ज्येष्ठ नेते माजी आमदार राजन पाटील, माजी आमदार यशवंत माने, माजी. जि.प सदस्य शहाजान शेख, लोकनेतेच शुगरचे चेअरमन बाळराजे पाटील, सिनेट सदस्य अजिंक्यराणा पाटील यांच्या माध्यमातून या प्रभागात जास्तीत जास्त निधी खेचून आणण्यामध्ये मुस्ताकभाई शेख आणि त्यांचे सहकारी असलेले नगरसेवक दत्ताअण्णा खवळे यांचा मोठा वाटा आहे. त्यामुळे या प्रभागात आता मुस्ताक भाई शेख यांच्या परिवारातील उमेदवारीमुळे राजन पाटील यांच्या नेतृत्वाखाली भाजपाचे पारडे आणखी जड होणार आहे.

Reactions

Post a Comment

0 Comments