श्री सिद्धेश्वर वुमेन्स पॉलिटेक्निकमध्ये न्यूजलेटर अंकाचे प्रकाशन
सोलापूर (कटूसत्य वृत्त):- श्री सिद्धेश्वर देवस्थान संचलित, श्री सिद्धेश्वर वुमेन्स पॉलिटेक्निकमध्ये न्यूजलेटरच्या ३१ व्या (मार्च २०२५ ते जून २०२५) अंकाचे प्रकाशन वसंतराव नाईक हायस्कुलचे प्राचार्य कार्तिक सुभाष चव्हाण, अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाचे सहाय्यक प्राध्यापक डॉ. प्रभाकर नागनाथ कोळेकर यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी बोलताना प्राचार्य कार्तिक चव्हाण यांनी तंत्रनिकेतनचे प्राचार्य, सर्व शिक्षक व विद्यार्थ्यांचे अभिनंदन करत हा उपक्रम यशस्वीपणे राबविल्याबद्दल विशेष कौतुक केले. त्याचप्रमाणे डॉ. प्रभाकर
कोळेकर यांनी न्यूज लेटर हे आपल्या महाविद्यालयात होणाऱ्या उपक्रमांचा आरसा आहे असे म्हणत न्यूज लेटरचे महत्व आपल्या मनोगतांमध्ये व्यक्त केले.
या कार्यक्रमावेळी तंत्रनिकेतनचे प्राचार्य, सर्व विभाग प्रमुख, विद्यार्थिनी उपस्थित होत्या. या न्यूजलेटरच्या अंकामध्ये औद्योगिक भेटी, एक्सपर्ट लेक्चर्स, विविध तांत्रिक कार्यशाळा, ट्रेनिंग अँड प्लेसमेंट उपक्रम, विद्यार्थिनींची व शिक्षकांची उल्लेखनीय कामगिरी, राज्यस्तरीय स्पर्धा, एनएसएस उपक्रम, तांत्रिक पेपर प्रेझेंटेशन तसेच आयईडीएसएसए अंतर्गत झालेल्या क्रीडा स्पर्धांमध्ये विद्यार्थिनींनी घेतलेला सहभाग आणि प्राप्त यशाची माहिती प्रकाशित करण्यात आली आहे. या न्यूजलेटर अंकासाठी प्राचार्य गजानन धरणे यांनी प्रमुख संपादक म्हणून तर प्रा.मंजुषा झिपरे यांनी संपादक म्हणून काम पाहिले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. शुभांगी माशाळकर यांनी केले.
0 Comments