Hot Posts

6/recent/ticker-posts

छत्रपती शिवाजी महाराजांचा सीबीएसईकडून अवमान

 छत्रपती शिवाजी महाराजांचा सीबीएसईकडून अवमान


२२०० पानी इतिहासाच्या पुस्तकात केवळ ६८ शब्द || भावना गवळींकडून सत्ताधाऱ्यांना घरचा अहेर



मुंबई (कटूसत्य वृत्त):-  राज्यात आणि केंद्रात हिंदुत्वावादी सरकार असताना सीबीएसईच्या अभ्यासक्रमात छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल केवळ ६८ शब्द आहेत. हा महाराजांचा अवमान आहे, अशा शब्दात शिवसेना आमदार भावना गवळी यांनी आपल्याच सरकारकडे रोष व्यक्त केला आहे.

इयत्ता पहिली ते दहावीपर्यंत सीबीएसईच्या इतिहासाची २२०० पान आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांवर त्यात फक्त ६८ शब्दच असणे, हे निषेधार्थ आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास महाराष्ट्रातल्या, देशातील मुलांपर्यंत सीबीएसईच्या माध्यमातून गेला पाहिजे. सरकारने यासंदर्भात एनसीईआरटी मार्फत छत्रपती शिवाजी महाराजांचा समावेश केला जावा, यासाठी प्रस्ताव पाठवला;

इतक्या गंभीर मुद्द्यावर केवळ प्रस्ताव पाठवून हात झटकले. सरकारची यामागे उदासीनता दिसून

येते, अशा शब्दांत प्रश्नोत्तराच्या तासात आमदार सत्यजीत तांबे यांनी महाराजांबाबत सुरू असलेल्या

दुर्लक्षावरून सरकारवर ताशेरे ओढले. आमदार गवळी यांनी देखील सरकारच्या भूमिकेवर आक्षेप घेतला. सीबीएसईचा पॅटर्न हा कित्येक वर्षांपासून इंग्रजी शाळांत राबवला जात आहे, तरीही शिवाजी महाराजांचा इतिहास विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचलेला नाही. हिंदुत्ववादी सरकारची भूमिका संभ्रम निर्माण करणारी आहे.

त्यामुळे अजून किती दिवस लागणार अभ्यासक्रम सीबीएसईमध्ये समाविष्ट करण्यासाठी? असा

सवाल विचारला. दिल्लीत धर्मेंद्र प्रधान मंत्री असून सरकारच्या शिष्टमंडळाने त्यांची भेट घेऊन

तातडीने पाठपुरावा करावा, अशी मागणी केली.


...चौकट...

केंद्र शासनाकडे शिष्टमंडळ घेऊन जाणार : भोयर राज्यमंत्री पंकज भोयर परिषदेतील प्रश्नांना उत्तरे दिली. सीबीएसई अभ्यासक्रमात छत्रपती शिवाजी महाराज यांच्यावरील इतिहास अपुराआहे. शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी केंद्रीय मंत्री यांना भेटून सविस्तर व अभ्यासपूर्ण इतिहासाचा समावेश करावा, अशी विनंती केली. त्यांनी अभ्यासक्रम समाविष्ट करण्याबाबत आश्वासन दिले आहे. पुढील काळात यासंदर्भात पाठपुरावा केला जाईल. आवश्यक वाटल्यास केंद्रीय शिक्षण मंत्री यांच्या भेटीसाठी शिष्टमंडळ घेऊन दिल्लीत ठाण मांडू, असे आश्वासनही त्यांनी दिले.

Reactions

Post a Comment

0 Comments