Hot Posts

6/recent/ticker-posts

कु. प्रवलिका कामुर्ती जिल्हास्तरीय लाठी स्पर्धेत यश

 कु. प्रवलिका कामुर्ती जिल्हास्तरीय लाठी स्पर्धेत यश




श्री नीलकंठेश्वर सोशल फाउंडेशनच्या वतीने भव्य सत्कार

सोलापूर (कटूसत्य वृत्त):- समाज भगिनी कु. प्रवलिका मोहन कामुर्ती हिने  सोलापूर जिल्हा लाठी असोसिएशन तर्फे आयोजित केलेल्या "जिल्हास्तरीय लाठी स्पर्धेत 1ल्या फेरीत गोल्ड पदक व 2 ऱ्या फेरीत सिल्वर पदक मिळवून घवघवीत यश संपादन केले आहे. त्यामूळै श्री नीलकंठेश्वर सोशल फाउंडेशन च्या वतीने कु. प्रवलिका कामुर्ती हिचा पुष्पहार व पेढा भरवून भव्य सत्कार करण्यात आला. तसैच, कु.प्रवलिका हिस प्रोत्साहनपर  काॅलेज बँग भेट देण्यात आली.

यावैळी ज्ञाती संस्था खजिनदार व श्री नीलकंठेश्वर शिक्षण संस्था संचालक श्रीनिवास अण्णा बंदगी, विश्वस्त नागेश टंकसाल, माजी विश्वस्त व फाउंडेशन चे सल्लागार शंकर अण्णा बटगिरी, फाउंडेशन चे अध्यक्ष लखन दादा रुमांडला, सचिव लखन अण्णा मिठ्ठा, नीलकंठेश्वर चॅम्पियन क्रिक्रेट स्पर्धेचे कार्तिक भैय्या चिकनी  व कामुर्ती परिवारातील सर्व सदस्य उपस्थित होते.

यावेळी शंकर बटगिरी, नागेश टंकसाल यांनी मनोगत व्यक्त केले. शेवटी लखन मिठ्ठा यांनी आभार मानले.

Reactions

Post a Comment

0 Comments