Hot Posts

6/recent/ticker-posts

बोंबाबोंब, आक्रोश करत शक्तिपीठला विरोध

 बोंबाबोंब, आक्रोश करत शक्तिपीठला विरोध




 सावळज :(कटूसत्य वृत्त):-  शक्तिपीठ महामार्गविरोधात सलग तिसऱ्या च दिवशीही मोजणी अधिकारी वर तासगाव तहसीलदार पाटोळे यांनाच शेतकऱ्यांनी मोजणी करण्यासडी रोखले. यावेळी वैतागलेल्यान शेतकऱ्यांनी व संघर्ष समितीने शासनाविरोधात चक्क बोंब मारून आक्रोश व्यक्त केला.

 सावळजमध्ये शक्तीपिठास शेतकऱ्यांचा विरोध असतानाही प्रशासन शेती जमिनीचे सीमांकन

करण्यासाठी धडपडत आहे. मात्र येथील शेतकरी त्यास कडाडून विरोध करीत असून सलग तिसऱ्या

दिवशीही शेतकऱ्यांनी मोजणी होऊ दिली नाही. आमची जमीन शक्तीपीठ महामार्गाला द्यायची नाही

याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, रस्ते विकास महामंडळाचे अनिल गायकवाड तसेच सर्व भूसंपादन अधिकारी यांना भेटून निवेदन दिल  आहे तरीही सलग तिसऱ्या दिवशी मोजणीला आलेले तहसीलदार व मोजणी अधिकारी यांच्यासमोर शेतकऱ्यांनी बोंबलून आक्रोश व्यक्त केला. चले जाव, चले जावची घोषणाबाजी केली. यावेळी दिगंबर कांबळे, शरद पवार, रमेश कांबळे, रवी साळुंखे, सुनील कांबळे, प्रदीप ईसापुरी, बाबासाहेब लांडगे बहुसंख्य शेतकरी उपस्थित होते..

Reactions

Post a Comment

0 Comments