Hot Posts

6/recent/ticker-posts

सोलापुरात खंडपीठ झाले पाहिजे, कायदेशीर मार्गाने लढा देण्याचा ठराव

सोलापुरात खंडपीठ झाले पाहिजे, कायदेशीर मार्गाने लढा देण्याचा ठराव


सोलापूर (कटूसत्य वृत्त):-राज्यात दीड लाखांहून अधिक खटले प्रलंबित आहेत. सध्या सोलापूरसह पुणे, सातारा, कोल्हापूर या जिल्ह्यांतील नागरिकांना न्यायासाठी मुंबई उच्च न्यायालयावर अवलंबून राहावे लागते, यासाठी सोलापुरात खंडपीठ झाले पाहिजे. यासाठी आंदोलने, कायदेशीर मार्गाने लढा देण्याचा ठराव शुक्रवारी बार असोसिएशनच्या बैठकीत करण्यात आला. यावेळी बैठकीत कृती समितीमार्फत मुख्यमंत्री, कायदामंत्री आणि उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश यांना भेट देऊन मागणी सादर करेल. शहर आणि ग्रामीण भागात सभा, मोर्चे आणि जाहीरनाम्यांद्वारे समाजाचा पाठिंबा मिळविण्यासाठी जनजागृती तयार करणे, सर्व पक्षांच्या नेत्यांना एकत्र आणण्यासाठी बहुपक्षीय बैठका घेण्यात येतील. असा निर्धार व्यक्त करण्यात सोलापूरला खंडपीठ मिळवण्यासाठी सर्वप्रकारचे आंदोलन, कायदेशीर लढा आणि राजकीय पाठपुरावा करण्याचा ठराव मंजूर करण्यात आला तसेच कृती समिती स्थापन करण्यात आली. आला. ज्येष्ठ वकील बापूसाहेब देशमुख, नीलेश ठोकडे, मंगला जोशी- चिंचोलकर, एच. एम. अंकलगी, दीक्षित वकील, मळसिद्ध देशमुख, दरगड वकील, पी. ए. कुलकर्णी, संजीव सदाफुले यांनी एकमताने खंडपीठाच्या मागणीला पाठिंबा दर्शविला. बैठकीचे सूत्रसंचालन सचिव अॅड. बसवराज हिंगमिरे यांनी आभार खजिनदार अरविंद देढे यांनी मानले.

कृती समितीची स्थापना
सोलापूरला खंडपीठ मिळवण्यासाठी सर्वप्रकारचे आंदोलन, कायदेशीर लढा आणि राजकीय पाठपुरावा करण्याचा ठराव मंजूर करण्यात आला तसेच कृती समिती स्थापन करण्यात आली.

कोण काय म्हणाले
अॅड. मिलिंद थोबडे : यापूर्वीच्या प्रयत्नांना गती देऊन, राज्यस्तरीय न्यायिक संस्थांसमोर सोलापूरचा केस मजबूतपणे मांडला जाईल

अॅड. शिवशंकर घोडके : खंडपीठामुळे सामान्य नागरिकांपासून ते नवोदित वकिलांपर्यंत सर्वांना न्याय मिळेल. बाबासाहेब जाधव : जिल्ह्यातील दीड लाख प्रलंबित खटले आणि नागरिकांना न्यायाच्या प्रती प्रतीक्षा लक्षात घेता, खंडपीठ ही गरज आहे

अॅड. रियाज शेख : खंडपीठ मिळवण्यासाठी आक्रमक पद्धती अवलंबिली जाईल. आम्ही सर्व काही करून ही मागणी मर्त स्वरूपात आण
Reactions

Post a Comment

0 Comments