तर अकलूज मधूनच रेशनिंगचा महाघोटाळा बाहेर येऊ शकतो?
"जनतेतून होत आहे सखोल चौकशीची मागणी"
अकलूज (विलास गायकवाड):- अकलूज मधील काही स्वस्त धान्य दुकानदार सोडले तर, स्वस्त धान्यांचा महाघोटाळा, अकलूज मधूनच बाहेर येऊ शकतो?याकरता संबंधित विभागाने प्रामाणिकपणे चौकशी केली तर अनेक स्वस्त धान्य दुकान चालक भ्रष्ट कारभाराच्या जाळ्यात अडकलेले दिसतील.
अकलूजसह माळशिरस तालुक्यातील काही स्वस्त धान्य दुकानदार धान्याचा काळाबाजार करतात हे सर्वश्रुत आहे. अकलूज मधील काही स्वस्त धान्य दुकान चालकच शासनाला गोलमाल करत आहेत.त्याकरता तीन महिन्याच्या धान्य वाटपाची सखोल चौकशी करणे तेवढेच गरजेचे आहे?
अकलूज मधील काही स्वस्त धान्य दुकानदार यांनी, पुरवठा विभागातील काही कर्मचारी, अधिकारी यांना आर्थिकतेचा नैवेद्य दाखवून बळीचा बकरा बनवण्याचे पाप करत आपला भ्रष्ट कारभाराचा नवस तडीस लावत आहेत.
सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार माळशिरस येथील, असणाऱ्या गोडवानातील एक हमाल करतो कमाल,म्हणूनच अकलूज येथील काही, रेशन दुकानदार झालेत मालामाल! अर्थात माळशिरस येथील गोडवानातून स्वस्त धान्य दुकानाकडे प्रस्थान होणारे, स्वस्त धान्याची वाट, अगदी पद्धतशीरपणे लावण्याचे काम, गोडवानातील एक हमाल करीत आहे. काही वर्षांपूर्वी रेशनिंग दुकानदारांनाच, गहू आणि तांदळाच्या एका गोणीसाठी त्रस्त करून सोडणारे, सध्याचे काही दुकान चालक,यांच्या स्वाधीन स्वस्त धान्य दुकाने कोणत्या निकषाने देण्यात आली? हा जनतेला पडलेला एक गहण प्रश्न आहे?
सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार अकलूज मधील काही हॉटेल व्यवसायिक,काही भुसार मालाचे व्यापारी, राईस नाश्ता विक्रेते तर अन्य पद्धतीने स्वस्त धान्याचा काळा बाजार होतो हे किरकोळ आहे. परंतु माळशिरस येथील ज्या गोडवान मधून, अकलूजचे स्वस्त धान्य दुकानदार माल उचलतात, त्या गोडवान मधील एका हमालाच्या मदतीने मोठ्या प्रमाणात शासकीय धान्याचा काळा बाजार होतोच तर स्वस्त धान्य दुकानदाराचा संपूर्ण माल, गोडवानातूनच जिरवण्याची कला सदर हमालाला अवगत असल्याचे खात्रीशीर वृत्त समोर आले आहे?
*चौकट*
उपस्थित झालेले काही प्रश्न,
आरक्षित कामगार मंडळाकडून नोंदणीकृत हमाले आहेत का?
हमालांची एम्प्लॉयमेंट नोंद आहे का?
अकलूज, माळशिरस, नातेपुते या गोडवानातील हमालांचा विमा भरण्यात आला आहे का?
0 Comments