Hot Posts

6/recent/ticker-posts

आगामी महापालिका निवडणूक हेच लक्ष्य

 आगामी महापालिका निवडणूक हेच लक्ष्य




राष्ट्रवादीचा आज मेळावा

 सोलापूर, (कटूसत्य वृत्त):- येणारी महापालिका निवडणूक हेच आमचे लक्ष्य असून त्यादृष्टीने आमची तयारी सुरू आहे. सोमवारी पक्षाचे प्रदेशाध्यक्ष तथा खासदार सुनील तटकरे यांच्या उपस्थितीत होत असलेला मेळावा हा त्याचाच एक भाग आहे. महायुतीत जास्तीत जास्त जागा मिळवून त्या निवडून आणण्यासाठी आमचा प्रयत्न राहणार आहे, असे राष्ट्रवादी अजित पवार गटाचे शहराध्यक्ष संतोष पवार व कार्याध्यक्ष जुबेर बागवान यांनी शनिवारी पत्रकार परिषदेत सांगितले.

आगामी महापालिका व जिल्हा परिषद निवडणुकीच्या अनुषंगाने पक्ष संघटन वाढीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष तथा खासदार तटकरे यांच्या उपस्थितीत सोमवार, २१ जुलै रोजी दुपारी २ वाजता हुतात्मा स्मृती मंदिरात शहरातील पदाधिकारी व
कार्यकर्त्यांचा मेळावा आयोजित करण्यात आला आहे. त्याची माहिती देण्यासाठी बोलावलेल्या पत्रकार परिषदेत पवार व बागवान बोलत होते.
या मेळाव्यात अन्य पक्षांतील काही पदाधिकाऱ्यांचा पक्ष प्रवेशही होणार आहे. नव्याने पक्षात येणाऱ्यांची नावे त्याचवेळी जाहीर केली जातील.
प्रदेशाध्यक्ष तटकरे हे धाराशिव येथून दुपारी २ वाजता सोलापुरात येतील. सुरूवातीला हुतात्मा स्मृती मंदिरात शहराचा मेळावा होईल आणि त्यानंतर गांधी नगर येथील हेरिटेज येथे ग्रामीणचा मेळावा होईल. सायंकाळी साडेपाच वाजता सुपर मार्केट येथील राष्ट्रवादी भवनात त्यांची पत्रकार परिषद होईल, असेही पवार व बागवान यांनी सांगितले.
यावेळी पक्षाचे ज्येष्ठ नेते चंद्रकांत दायमा, हेमंत चौधरी, परिवहन समितीचे माजी सभापती आनंद मुस्तारे, जनरल सेक्रेटरी प्रमोद भोसले, महिला आघाडीच्या प्रदेश सरचिटणीस सायरा शेख, शहर कार्याध्यक्षा चित्रा कदम, युवती अध्यक्ष किरण माशाळकर, युवक अध्यक्ष सुहास कदम, सेवादल विभाग अध्यक्ष प्रकाश जाधव, अमीर शेख, वैभव गंगणे उपस्थित होते.

Reactions

Post a Comment

0 Comments