Hot Posts

6/recent/ticker-posts

आदर्श शिक्षक पुरस्कारासाठी मागविले प्रस्ताव

 आदर्श शिक्षक पुरस्कारासाठी मागविले प्रस्ताव



जि. प. प्राथमिक शिक्षण विभाग : ३० जुलैपर्यंत प्रस्ताव पाठवण्याचे आवाहन


सोलापूर :(कटूसत्य वृत्त):- जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षण विभागाकडून दरवर्षी पाच सप्टेंबरला

शिक्षकांचा आदर्श शिक्षक पुरस्काराने सन्मान केला जातो. त्यासाठी जिल्ह्यातील शिक्षकांनी ३० जुलैपर्यंत प्रस्ताव पाठवावे, असे आवाहन शिक्षण विभागाने केले आहे. 

जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यातील एका शिक्षकास सर्वसाधारण जिल्हास्तरीय पुरस्कार देण्यात येतो. प्रत्येक तालुक्यातील एका शिक्षकास तसेच शिष्यवृत्ती परीक्षेत जास्त विद्यार्थी शिष्यवृत्तिधारक झालेल्या शिक्षकांना शिष्यवृत्ती पुरस्काराने सन्मानित केले जाते. त्यामुळे प्रत्येक तालुक्यातील पात्र शिक्षकांनी

आदर्श शिक्षक पुरस्कारासाठी दोन प्रतीमध्ये वेळेत प्रस्ताव सादर करावा, अशा सूचना  शिक्षण विभागाने दिल्या आहेत. जिल्ह्यात माढा तालुक्यात जिल्हा परिषदेची एक माध्यमिक शाळा आहे. त्या शाळेतील माध्यमिक शिक्षकांनी प्रस्तावासाठी शिक्षण विभागाकडे प्रस्ताव सादर करावा, असेही आवाहन शिक्षण

विभागाने केले आहे.

 चौकट १ 

'या' आहेत अटी

किमान दहा वर्ष सेवा, पाच वर्षाचा गोपनीय अहवाल, कोणतेही

शासकीय कारवाई नसल्याचे प्रमाणपत्र, निर्व्यसनी असलेली शाळा

व्यवस्थापन समितीचे प्रमाणपत्र, पुरस्कार मिळालेल्या शिक्षकांना

पुन्हा अर्ज करता येणार नाही, पोलिसांकडील चारित्र्य प्रमाणपत्र.


आदर्श शिक्षक पुरस्कारासाठी प्रस्ताव मागविले आहेत.

जास्तीत जास्त शिक्षकांनी वस्तुनिष्ठ माहिती भरून

प्रस्ताव पाठवावेत. जिल्हास्तरीय सर्वसाधारण अकरा,

शिष्यवृत्तीधारक अकरा आणि माध्यमिक शिक्षण विभागाचा एक

असे एकूण २३ पुरस्कार प्रस्तावातून दिले जाणार आहे.

Reactions

Post a Comment

0 Comments