खुनाचा प्रयत्न आरोपीस जामीन मंजूर
यातील आरोपी बसण्णा सत्तु शिंदे वय: ३० वर्षे, रा. शिवाजी नगर सोलापूर याची खुनाचा प्रयत्न केल्याच्या खटल्यातुन जामीनावर अतिरिक्त सत्र न्यायाधिश श्री.पी.पी. राजवैद्य साहेब यांनी जामीनावर मुक्तता केली. यातील हकीकत अशी की, घटनेच्या ३ महिन्यापुर्वी झालेल्या भांडणाचा राग मनात धरुन ता. २३/११/२०२४ पहाटे ४ वाजणेचे सुमारास जखमी इम्रान शब्बीर इनामदार वय : २५ वर्षे, रा. इंदिरानगर झोपडपट्टी, ७० फुट रोड याचा मार्केट यार्ड सोलापूर येथे कोयत्याने मारहाण करुन गंभीर जखमी केल्याचे आरोपावरुन अटकेत असलेले आरोपी बसण्णा शिंदे व इतर तीन आरोपींविरुध्द खटला मे. सेशन्स कोर्ट सोलापूर येथे दाखल आहे. आरोपी बसण्णा शिंदे यांनी जामीन मिळणेसाठी अॅड. निलम वाडेकर यांचेतर्फे अर्ज दाखल केला होता. सदर अर्जाचे सुनावणी दरम्यान आरोपीचे वकिलांनी पोलीसांचा तपास पूर्ण झालेला आहे, दोषारोप पाठविलेले आहे, सकृतदर्शनी खुनाचा प्रयत्न केला असे दिसुन येत नाही असा युक्तीवाद केला व तो युक्तीवाद ग्राह्य धरुन मे. कोर्टाने जामीन अर्ज मंजूर केला. यात आरोपीतर्फे अॅड. निलम वाडेकर तर सरकार पक्षातर्फे श्रीमती अॅड. माधुरी देशपांडे
यांनी काम पाहिले.
0 Comments