Hot Posts

6/recent/ticker-posts

सरकारी कामात अडथळा केल्याप्रकरणातुन दोन्ही आरोपींची निर्दोष मुक्तता

 सरकारी कामात अडथळा केल्याप्रकरणातुन दोन्ही आरोपींची निर्दोष मुक्तता


फिर्यादी पो.कॉ. सतिश शिवाजी आवले अक्कलकोट, उत्तर पोलीस ठाणे व इतर पो.कॉ. हे सरकारी काम करित असताना त्यांचे कामात अडथळा आणला, धक्काबुक्की केल्याचे आरोपामधुन दिपक उत्तम गायकवाड वय : २५ वर्षे, रा. हणमगाव व दुसरा बसवराज गजधाने वय: ३० वर्षे, रा. गौडगांव या दोघांची अति. सत्र न्यायाधिश श्री. प्रशांत राजवैद्य साहेब यांनी निर्दोष मुक्तता केली. फिर्यादी पो.कॉ. सतिश आवले व इतर पोलीस हे ता. १४/१२/२०२० रोजी सायंकाळी ०५.३० वाजणेचे सुमारास अक्कलकोट येथील आठवडी बाजार असल्यामुळे नगर पालिकेसमोर विनामास्कच्या केसेस करत होते. त्यावेळी आरोपी हे मोटारसायकल क्र. एमएच-१३ - डीपी - ३५१५ या हिरो कंपनीचे गाडीवरुन विनामास्क फिरत होते. त्यावेळी फिर्यादीने त्या दोघांना अडविले त्यावेळी आरोपींनी अरेरावीची भाषा वापरली फिर्यादीस धक्काबुक्की केली व पोलीस गणवेशाचा शर्ट पकडून मारहाण केली व दिपक गायकवाड याने त्याचे ताब्यातील मोटार सायकल फिर्यादीचे अंगावर ढकलली त्यामुळे फिर्यादीचे डाव्या अंगठ्यास जखम झाली, तसेच आरोपीचे मोटारसायकलची तपासणी केली असता शालीमध्ये लपेटलेली एक तलवार मोटारसायकलला अडकविलेचे दिसुन आले. सदर घटनेचा तपास करुन पोलीस तपासिक अधिकारी डी.बी. राठोड यांनी दोषारोप पत्र मे सेशन कोर्टात पाठविले. सरकार पक्षातर्फे फिर्यादी सतिश शिवाजी आवले, पो. कॉ. बशीर शेख, डॉ. अशोक राठोड यांचेसह एकुण पाच साक्षीदार तपासण्यात आले. साक्षीदारांच्या साक्षी विश्वासाहर्य नाहित आरोपींनी बळाचा वापर करुन शासकीय कामात अडथळा केल्याबद्दल स्पष्ट पुरावा कोर्टापुढे आलेला नाही. यावरुन दोन्ही आरोपींची निर्दोष मुक्तता केली. यात आरोपीतर्फे अॅड. निलम वाडेकर, अॅड. मीरा प्रसाद यांनी काम पाहिले.
Reactions

Post a Comment

0 Comments