Hot Posts

6/recent/ticker-posts

एमआयएम पक्षात नाराज : मात्र पक्ष सोडणार नाही : शौकत पठाण !

 एमआयएम पक्षात नाराज : मात्र पक्ष सोडणार नाही : शौकत पठाण !

सोलापूर(कटूसत्य वृत्त):- एमआयएम पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष असदुद्दीन ओवेसी आणि प्रदेशाध्यक्ष इम्तियाज जलील यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच  एमआयएमचे सोलापूर शहराध्यक्ष फारूक शाब्दी यांचा सहकारी म्हणून काम करण्याच्या उद्देशाने आपण विधानसभा निवडणुकीच्यावेळी एमआयएम पक्षामध्ये प्रवेश केला. आपणास जिल्हाध्यक्ष करण्यात आले असून अद्याप तसे पत्र आपल्याला देण्यात आलेले नाही. आज ना उद्या आपणास पत्र मिळेल. सध्या एमआयएम पक्षात आपण  नाराज असलो तरी पक्ष सोडणार नाही, असे सांगत आगामी सोलापूर महानगरपालिका निवडणुकीत शहराध्यक्ष फारुख शाब्दी यांच्यासोबत काम करत आपण २२ नगरसेवक निवडून आणणार असल्याचे एमआयएमचे जिल्हाध्यक्ष शौकत पठाण यांनी मंगळवारी पत्रकारांशी बोलताना सांगितले.

    विधानसभा निवडणुकीपासून मुस्लिम समाज काँग्रेसपासून पूर्णपणे बाजूला गेला आहे. बाजूला गेलेला मुस्लिम समाज सध्या एमआयएम सोबत आहे. त्यामुळेच शाब्दी यांना विधानसभा निवडणुकीत जास्तीत जास्त मते मिळाली आहेत. काँग्रेस पक्षात मानसन्मान मिळत नाही, परंतु एमआयएम पक्षात मात्र मान आणि सन्मान मिळत आहे. काही अंशी नाराजी असली तरी आपण पक्षात राहूनच एमआयएमचे सर्वाधिक नगरसेवक निवडून आणण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचेही जिल्हाध्यक्ष पठाण यांनी सांगितले.

  एमआयएमचे प्रदेशाध्यक्ष इम्तियाज जलील यांनी आपणास किती नगरसेवक निवडून आणणार  ? असे विचारल्यानंतर आपण २२ नगरसेवक निवडून आणणार असल्याचे सर्वांसमक्ष सांगितले होते. त्यानंतर त्यांनी सोलापूर महानगरपालिका निवडणुकीच्या अनुषंगाने लक्ष घालून कामाला सुरुवात करण्यास ही सांगितले आहे.मात्र जिल्हाध्यक्ष झाल्यानंतर आपणास सोलापूर शहरातील राजकीय घडामोडीपासून वंचित ठेवण्यात येत आहे.त्यामुळे आपण कमालीचे नाराज झालो आहोत. आपणास अद्यापही जिल्हाध्यक्षपदाचे पत्र देण्यात आले नसल्याबाबत आपण प्रदेशाध्यक्ष इम्तियाज जलील आणि शहराध्यक्ष फारूक शाब्दी यांच्याकडे नाराजी बोलून दाखविली आहे.  घरगुती अडचणीमुळे काही दिवस आपण एमआयएम पासून दूर गेलो होतो. परंतु आता आगामी सोलापूर महानगरपालिका निवडणुकीच्या अनुषंगाने कामाला सुरुवात केली आहे.मात्र नाराजीचा सूर कायम आहे.फारूख शाब्दी आणि आपण दोघे मिळून महापालिकेची उमेदवारी देण्याबरोबरच सर्वाधिक एमआयएमचे नगरसेवक निवडून आणण्यासाठी सुद्धा प्रयत्न करणार असल्याचे शौकत पठाण यांनी सांगितले.

Reactions

Post a Comment

0 Comments