Hot Posts

6/recent/ticker-posts

दीड लाख रेशन कार्डधारक लाभापासून वंचित

 दीड लाख रेशन कार्डधारक लाभापासून वंचित



   

   सोलापूर (कटूसत्य वृत्त):- शासनाकडून स्वस्त धान्याचा लाभ घेण्यासाठी ई केवायसी करणे बंधनकारक असून, अद्यापही सोलापूर शहरातील चारही परिमंडळातील 1 लाख 50 हजार 388 लोक ई केवायसी केले नसल्याचे समोर आले आहे.  गेल्या मार्च 2025 पासून ई-केवायसी करण्याचे काम प्रक्रिया सुरू आहे. आतापर्यंत शासनाकडून चार वेळा ई केवायसी करून देण्यासाठी मुदतवाढ देण्यात आली आहे. बोगस रेशन कार्डधारकांना आळा घालण्यासाठी ई केवायसी करणे बंधनकारक करण्यात आला आहे. ई केवायसी न केल्यास रेशन कार्डमधून नाव रद्द होण्याबरोबरच धान्यापासून वंचित राहावे लागणार आहे.

ई-केवायसी म्हणजे नो युवर कस्टमर किंवा तुमच्या ग्राहकाला जाणून घ्या. या प्रक्रियेमध्ये, रेशन कार्डधारकांची ओळख आणि आधार कार्ड, मोबाईल नंबर सत्यापित केला जातो. स्वस्त धान्य वितरणातील होणारी अनियमितता कमी करून पारदर्शकता वाढविण्यासाठी ही सिस्टम अंमलात आणली जाणार आहे. सध्या आधार कार्ड, पॅनकार्डप्रमाणे रेशन कार्ड हा एक महत्त्वाचा दस्ताऐवज आहे. रेशन कार्डचे पांढरं, केशरी आणि पिवळ असे तीन प्रकारचे रेशन कार्ड असून, पिवळ्या आणि केशरी रेशन कार्डधारकांना सरकारकडून मोफत किंवा परवडणार्‍या किमतीत अन्नधान्य दिले जाते. त्यामुळे शासनाने आता ई केवायसी बंधनकारक केली आहे.

Reactions

Post a Comment

0 Comments