श्री सिद्धेश्वर शिक्षण मंडळाच्या आर्किटेक्चर कॉलेजमध्ये वृक्षारोपण
सोलापूर (कटूसत्य वृत्त):- महाराष्ट्र शासनाच्या दहा कोटी वृक्ष लागवड मोहिमेच्या अनुषंगाने, श्री सिद्धेश्वर शिक्षण मंडळ संचालित कॉलेज ऑफ आर्किटेक्चरच्या आवारात दुपारी 1.00 वाजता भव्य वृक्षारोपण कार्यक्रम आयोजित करण्यात आला. या कार्यक्रमाचे आयोजन पदवी, पदविका शाखा तसेच शाळा विभागाच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आले होते.
कार्यक्रमात बकुल, बेल, बहावा, पारिजात, चिंच इत्यादी विविध प्रकारची रोपे लावण्यात आली. या उपक्रमात संस्थेचे विश्वस्त वैजिनाथ देवणीकर, शंकर पाटील, मल्लिकार्जुन कावळे, गजानन धरणे, बसवराज बिराजदार, धनेश जवळेकर स्वामी व राजेंद्र मायनाळ यांची प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी पदवी, पदविका शाखेतील तसेच शाळेतील सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी आणि पालकवर्ग मोठ्या संख्येने सहभागी झाला. कार्यक्रमात "आजच्या आधुनिक जीवनशैलीत वृक्षांचे महत्त्व" या विषयावर संस्थेचे विश्वस्त मल्लिकार्जुन कावळे आणि राजेंद्र मायनाळ यांनी मार्गदर्शनपर मनोगत व्यक्त केले.
सदर उपक्रमास शहरातील अनेक मान्यवर नागरिकांनीही उपस्थित राहून वृक्षारोपण मोहिमेस प्रतिसाद दिला.
0 Comments