कुंभार समाजातील ५४ गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव
सोलापूर(कटूसत्य वृत्त):- नीलम नगर येथील नेताजी सुभाषचंद्र बोस कन्नड भाषा व कन्नड संस्कृती संवर्धक कुंभार समाज शिक्षण प्रसारक मंडळाच्यावतीने कुंभार समाजातील ५४ गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्था अध्यक्ष अण्णाराव कुंभार होते.
प्रथम संत गोरोबा काका, वीरतपस्वी चन्नवीर शिवाचार्य महास्वामीजी, तपोरत्नं योगीराजेंद्र शिवाचार्य महास्वामीजी यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.
यावेळी व्यासपीठावर संस्थेच्या खजिनदार ललिता कुंभार, जिल्हा कुंभार समाज संघटनेचे अध्यक्ष गुरुलिंग कुंभार,माजी जिल्हाध्यक्ष हनुमंत कुंभार, माजी नगरसेवक भीमाशंकर म्हेत्रे, रवींद्र कुंभार, लेखापरीक्षक महेश आळंगे, धानय्या मठपती, सेवानिवृत्त प्राचार्य रेवणसिद्ध रोडगीकर, सुभाष धुमशेट्टी, विजयकुमार हुल्ले, ज्ञानेश्वर म्हेत्रे, प्राचार्य रविशंकर कुंभार, मुख्याध्यापक शिवानंद मेणसंगी, मुख्याध्यापिका वैशाली कुंभार, विजयालक्ष्मी कुंभार, पर्यवेक्षक गौरीशंकर आळंगे आदी मान्यवर उपस्थित होते.यावेळी कुंभार समाजातील दहावी व बारावी परीक्षेत यश संपादन केलेल्या ५४ गुणवंत विद्यार्थ्यांचे पालकांसह धनादेश देऊन गौरविण्यात आले.
कार्यक्रमाचे अध्यक्ष अण्णाराव कुंभार म्हणाले, कुंभार समाजातील विद्यार्थ्यांची जिद्द, मेहनत आणि प्रगती यांचा आढावा घेणारा हा कार्यक्रम आहे. गुणवंत विद्यार्थ्यांना प्रेरणा मिळावी, त्यांच्या मनात जागृती निर्माण व्हावी. विद्यार्थ्यांनी मनापासून शिक्षण घेतले पाहिजे. कोणत्याही अडथळ्यामुळे प्रगती थांबू देऊ नये. समाजात आनंद निर्माण करणारे कार्य करत राहावे असे आवाहन केले.
कुंभार समाजाचे माजी जिल्हाध्यक्ष हनुमंत कुंभार म्हणाले, आर्थिक अडचणीमुळे उच्च शिक्षण घेऊ न शकणाऱ्या विद्यार्थ्यांची व्यथा अण्णाराव कुंभार यांनी ओळखून समाजातील विद्यार्थ्यांना मदतीचा हात दिला आहे, हे प्रेरणादायी कार्य आहे. विद्यार्थ्यांनी याची जाणीव ठेवून आई वडिलांचे नाव लौकिक करावे.मोबाईलचा आवश्यक तितकाच वापर करावा,पण मोबाइलच्या व्यसनी पडू नये असे आवाहन केेले. माजी नगरसेवक भीमाशंकर म्हेत्रे म्हणाले,अण्णाराव कुंभार हे गेल्या १६ वर्षांपासून समाजहिताचे कार्य सातत्याने करत आहेत. विद्यार्थ्यांनी या उपक्रमाचा लाभ घेऊन यशाचे शिखर गाठावे.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विश्वाराध्य मठपती यांनी केले तर मुख्याध्यापिका विजयालक्ष्मी कुंभार यांनी आभार मानले. कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी विठ्ठल कुंभार, सिद्धाराम कुंभार, चंद्रकुमार कुंभार,गोदावरी कुंभार,उमादेवी कुंभार,गणपती पाटील,राजेंद्र मुलगे, शिवानंद पुजारी,शिवकुमार शिरूर, प्रकाश कोरे,जयश्री बिराजदार, विजयालक्ष्मी माळवदकर, विनायक कोरे,अशोक पाटील यांच्यासह सर्व शिक्षक, शिक्षिका, शिक्षकेत्तर कर्मचारी वृंदानी परिश्रम घेतले.
*चौकट*
*यांचा झाला सन्मान*
श्रुती समाधान कुंभार(९७ %), समृध्दी शिवानंद कुंभार (९६.६०%),स्नेहा सुभाष कुंभार(९६.२०%), श्रेयस महादेव कुंभार(९५.४०%), संचिता रमेश कुंभार (९५.२०%), प्रीतम चंद्रकांत कुंभार(९४.८०%), अवंतिका रविंद्र टाकळीकर (९२.००%),, भक्ती चंद्रशेखर कुंभार (९१.८०),प्रतिक्षा सोमनाथ कुंभार(९१.८० %), साई चन्नप्पा कुंभार (९१.२०%), श्रुतिका रवींद्र कुंभार(९०.८०%),
लक्ष्मी चन्नमल्लेश कुंभार (९०.६० ),अभिषेक श्रीकृष्ण कुंभार(८९.२०%)या गुणवंतासह ५४ विद्यार्थ्यांचा सन्मान झाला.
0 Comments