नागणसूर महास्वामीजींची सोलापुरात गुरुपौर्णिमा कार्यक्रम
सोलापूर (कटूसत्य वृत्त):- नागणसूर येथील श्री गुरु बम्मलिंगेश्वर मठाचे मठाधिपती श्रीकंठ शिवाचार्य महास्वामीजी यांचे यंदाचे गुरुपौर्णिमेचा कार्यक्रम सोलापुरातील अक्कलकोट रोडवरील विष्णुपंत नगर,रोशन प्रशालेजवळील बम्मलिंगेश्वर शाखा मठात आयोजित करण्यात आले आहे. सोमवार दि. ३० जून ते गुरुवार दि.१० जुलै पर्यंत विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. रोज सकाळी सहा वाजता बसय्या स्वामी सांभाळ, सिद्धलिंग हिरेमठ नागणसूर यांच्या वैदिकत्त्वाखाली श्री शिवलिंगास रुद्राभिषेक ,श्री सहस्त्र बिल्वार्चन, महामंगल आरती होणार आहे.सोमवार दि.३० जून रोजी सायंकाळी सहा वाजता धानम्मा देवी पुराण प्रवचनाला प्रारंभ होणार आहे . प्रवचनकार योगीराजेंद्र शास्त्री खानापूर हे आपल्या रसाळ वाणीतून पुराण प्रवचन करणार आहेत. विरुपाक्षय्या गौडगाव यांचे संगीत साथ तर वीरेश हिरेजेवूरगी दण्णूर यांचे तबला साथ मिळणार आहे. बुधवार दि. ९ जुलै रोजी काशी पीठाचे जगद्गुरु श्री श्री श्री १००८ डॉ. मल्लिकार्जुन विश्वाराध्य शिवाचार्य महास्वामीजी यांच्या उपस्थितीत धर्मसभा आयोजित करण्यात आली आहे. गुरुवार दि. १० जुलै रोजी मठाधिपती श्रीकंठ शिवाचार्य महास्वामीजी यांची सामूहिक इष्टलिंग महापूजा, धर्मसभा मान्यवरांचा सन्मान संपन्न होणार आहे.मठाच्यावतीने महाप्रसाद वाटप करण्यात येणार आहे तरी सदभक्तांनी श्री गुरु दर्शन आशीर्वादाचा लाभ घ्यावा असे आवाहन नागणसूर,रेवूर व सोलापूर येथील बम्मलिंगेश्वर सदभक्त मंडळाच्यावतीने करण्यात आले आहे.
0 Comments