Hot Posts

6/recent/ticker-posts

केम येथे लोणीकरांच्या प्रतिमेला जोडे मारो आंदोलन

  केम येथे लोणीकरांच्या प्रतिमेला जोडे मारो आंदोलन


करमाळा (कटूसत्य वृत्त):- भाजप आमदार बबनराव लोणीकर यांनी भर सभेमध्ये शेतकऱ्यांबद्दल अत्यंत खालच्या पातळीवर जाऊन वक्तव्य केले आहे, "तुझ्या बापाला पेरणीचे पैसे पंतप्रधान मोदींनी दिलेत", तुझ्या आईला, बहिणीला व बायकोला लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून आम्ही पैसे देतो. "तुमच्या अंगावरचे कपडे, बूट व चपला आम्हीच दिल्यात" असे वादग्रस्त वक्तव्य भाजप आमदार बबन लोणीकर यांनी केल्यामुळे त्यांच्या निषेधार्थ करमाळा तालुक्यातील केम येथे प्रहार संघटनेच्या माध्यमातून भाजप आ.बबनराव लोणीकर यांच्या प्रतिमेला जोडो मारो आंदोलन करुन त्यांच्याविरुद्ध घोषणा देऊन प्रहार स्टाईलने निषेध व्यक्त करण्यात आला. 
यावेळी बोलताना प्रहार संघटनेचे तालुका अध्यक्ष संदीप तळेकर यांनी म्हणाले की, आमच्या घामाच्या पैशावर देश चालतो, अन्नधान्य आम्ही पिकवतो, आमच्या मतावर तु व तुझा बाप पण निवडुन येतो. अन् आमचा बाप काढतो. बबनराव तुझा बाप असेल मोदी जगाचा बाप शेतकरी आहे. हे लक्षात ठेव. शेतकरी हा जगाचा पोशिंदा आहे. आम्ही अन्नधान्य पीकवतो म्हणून तुम्ही सर्वजण खाता. भाजप आमदार बबनराव लोणीकर यांना सत्तेची मस्ती आल्याने असे वक्तव्य करण्यात येत आहे,त्याचा निषेध म्हणून प्रहार संघटना करमाळा तालुका अध्यक्ष संदीप तळेकर, प्रहार जिल्हा सरचिटणीस बापू तळेकर, एपी ग्रुप संस्थापक अध्यक्ष अच्युत काका पाटील, उपसरपंच सागर कुरडे, कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक सागर दोंड, ग्रामपंचायत सदस्य विजयसिंह ओहोळ, गोरख काका पारखे, शरद वायभासे, विष्णू तात्या अवघडे, युवा नेते,दादासाहेब पारखे, किरण तात्या तळेकर, सौदागर बिचीतकर, पिनु तळेकर, सुरेश गुटाळ, अविनाश कुलकर्णी, व गावातील व आजूबाजू गावातील सर्व शेतकरी बांधव प्रहार संघटनेचे कार्यकर्ते, पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Reactions

Post a Comment

0 Comments