Hot Posts

6/recent/ticker-posts

माऊली शिक्षण संस्थेच्या वतीने नीट जेईई सीईटी मधील गुणवंत विद्यार्थ्यांची सन्मान रॅली

 माऊली शिक्षण संस्थेच्या वतीने नीट जेईई सीईटी मधील गुणवंत विद्यार्थ्यांची सन्मान रॅली



टेंभुर्णी (कटूसत्य वृत्त):- श्री माऊली शिक्षण प्रसारक व समाजसेवा मंडळ टेंभुर्णी यांचे वतीने आयोजित NEET/JEE/CET तसेच दहावी/बारावी बोर्ड परीक्षेतील गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान सोळा मोठ्या दिमाखात पार पडला.  डॉ. बाबासाहेब आंबेडकर उद्यान ते छत्रपती संभाजी महाराज स्मारक या दरम्यान भव्य रॅलीचे आयोजन करण्यात आले होते.  
 यावेळी नीट परीक्षेतून ऋग्वेद बेंदगुडे ५७६, साक्षी गायकवाड ५४७, विवेक बडे ५४१,  ज्योतिका कांबळे ४७०,अश्विन शेंडगे४५६ हर्षवर्धन वाघमारे,४२९ तसेच जेईई मधून समर्थ आमले ९७.०८% तसेच सीईटी मधून समर्थ आमले ९९.०३%, अथर्व पवार ९३.०८, राजवर्धन वगैरे ८७.०३%, राजवर्धन देशमुख ८५.%, निकिता घुमरे, ८५% रिया ढवळे पाटील ८०% इतके गुण मिळवून या विद्यार्थ्यांनी यश संपादित केले. 
 यावेळी योगेशजी बोबडे बोलताना म्हणाले की, माऊली शिक्षण संसंथेच्या सनराइिज फाऊंडेशन क्लासेसच्या माध्यमातून सीईटी, जेईई, नीट यांसारख्या परीक्षांना सामोरे जाण्यासाठी विद्यार्थ्यांना एक चांगल्या प्रकारचे दर्जेदार शिक्षण उपलब्ध झाले आहे. तसेच ओलिंपियाड, शिष्यवृत्ती, नवोदय मंथन यांसारख्या अन्य स्पर्धा परीक्षांसाठी वर्ग सुरु केले आहेत ज्याचा परिसरातील मुलांना अधिक फायदा होईल. 
   यावेळी संस्थेचे अध्यक्ष योगेशजी बोबडे, सचिवा सुरजा बोबडे, अनुराधा काकी बोबडे,  शैक्षणिक संचालिका शाहिदा पठाण प्राचार्य प्रभाकर सर, प्राचार्य विकास करळे, पीआरओ सागर खुळे, इतर शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Reactions

Post a Comment

0 Comments