लोकमंगल कृषी व कृषी संलग्नित महाविद्यालयात कृषी दिन साजरा
सोलापूर (कटूसत्य वृत्त):- श्रीराम ग्रामीण संशोधन व विकास प्रतिष्ठान संचलित लोकमंगल कृषीजैवतंत्रज्ञान व लोकमंगल कृषी व्यवसाय व्यवस्थापन महाविद्यालयात महाराष्ट्र कृषी दिन साजरा करण्यात आला. या कार्यक्रमासाठी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सचिन फुगे हे अध्यक्ष म्हणून लाभले होते. कार्यक्रमाच्या प्रारंभी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते महाराष्ट हरित क्रांतीचे जनक व माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. याप्रसंगी लोकमंगल कृषीजैवतंत्रज्ञान महाविद्यालयाचे प्राचार्य सागर महाजन, लोकमंगल कृषी व्यवसाय व्यवस्थापन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ सचिन फुगे, रा. से. यो. कार्यक्रम अधिकारी प्रा. आशिष सरकाळे, प्रा. स्वप्निल कदम, प्रा. वर्षा मानेदेशमुख, प्रा. अंकिता पवार, प्रा. सुप्रिया डोके, प्रा . निशा काटे तसेच महाविद्यालयातील सर्व विदयार्थी उपस्थित होते. यानंतर प्रमुख पाहुणे दयानंद गवळी यांचा सत्कार प्राचार्य सागर महाजन यांच्या हस्ते व शिवानी म्हस्के यांचा सत्कार प्रा. निशा काटे यांच्या हस्ते पुष्पगुच्छ, शाल व संवाद हे मा. सुभाषबापू देशमुख यांचे आत्मचरित्रपर पुस्तक देऊन करण्यात आला. विद्यार्थिनी तृप्ती जाधवर यांनी महाराष्ट्र कृषी दिनाचे महत्त्व व माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांचे कृषीतील योगदान यांविषयी मनोगत व्यक्त केले.
यानंतर प्रमुख पाहुणे दयानंद गवळी यांनी उपस्थित विद्यार्थ्यांना आजच्या काळात शेतीतील आर्थिक व्यवस्थापन, पीक लागणीपासून ते काढणीपर्यंत पिकांचे नियोजन व शेतीतील आव्हाने या विषयावर मार्गदर्शन केले.
प्रमुख अतिथी शिवानी म्हस्के (सल्लागार ऍग्रो स्टार कंपनी प्रा. लिमिटेड, पुणे) यांनी उपस्थित विद्यार्थ्यांना कृषीदुत म्हणून कृषीच्या विद्यार्थ्यांनी शेतकऱ्यांना मार्गदर्शन कशाप्रकारे करावे व कृषी सल्लागार या क्षेत्रातील विविध संधी याविषयी मार्गदर्शन केले. प्राचार्य सागर महाजन यांनी उपस्थित विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना सांगितले की कृषी संस्कृतीचे स्मरण आणि शेतकरी कृतज्ञता प्रतीक म्हणून 1 जुलै कृषी दिनाला अनन्यसाधारण महत्व आहे. आधुनिक शेती तंत्राचा जागर व्हावा, शेतीकडे पाहण्याचा दृष्टिकोन सकारात्मक व्हावा या उद्देशाने कृषी दिन साजरा केला जातो. प्राचार्य डॉ सचिन फुगे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना आपल्या कृषीदुत म्हणून कृषीच्या विद्यार्थ्यांनी कृषी क्षेत्रातील उद्योजकतेला प्रोत्साहन द्यावे. शेतकऱ्यांचे प्रश्न सोडविण्यासाठी आपण कृषीतील आर्थिक व्यवस्थापन समजून घेणें गरजेचे आहे. आपल्या कृषी शिक्षणाचा उपयोग करून विद्यार्थ्यांनी सरकारच्या विविध योजना व तंत्रज्ञान प्रत्येक शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवणे आवश्यक आहे असे मनोगत व्यक्त केले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन वैष्णवी मागाडे यांनी व आभार नक्षत्रा कांबळे यांनी व्यक्त केले.
0 Comments