ई-टायलेटची सेवा मोफत देण्याचा सोलापूर पालिकेचा निर्णय
सोलापूर (कटूसत्य वृत्त):- शहरातील ई टॉयलेटबाबत महपालिकेला तब्बल चार वर्षांनी चूक उमगली. त्यामुळे ई-टायलेटची सेवा मोफत देण्याचा निर्णय पालिकेने घेतला आहे. त्यासाठी चेन्नईच्या कंपनीला देखभाल व दुरुस्तीचा दोन वर्षांचा ४० लाखाचा मक्ता दिला आहे.
स्मार्ट सिटी योजनेअंतर्गत शहरातील वर्दळीच्या २५ ठिकाणी ५१ ई-टॉयलेट उभारण्यात आले होते. या ई-टॉयलेटमुळे शहरात स्वच्छता आणि सार्वजनिक सुविधांमध्ये सुधारणा अपेक्षित होती. पण, सुविधेसाठी सुट्टे पैसे टाकावे लागत. गरजेच्या वेळी नागरिकांकडे नाणे नसल्याने ई-टायलेट अडगळीत पडून होते. पालिकेला चार वर्षांनी चूक उमगली आणि आता सुविधा मोफत झाली.
स्मार्ट सिटी योजनेंतर्गत शहरातील पायाभूत सुविधा सक्षम करण्यासाठी, शहरात सार्वजनिक स्वच्छतागृहांची सुविधा वाढवून नागरिकांना चांगल्या स्वच्छता सुविधा उपलब्ध करुन देण्याच्या मुख्य उद्देशाने पुणे व मुंबईच्या धर्तीवर चार वर्षांपूर्वी ई-टायलेट उभारले होते. पहिल्या टप्प्यात २०१९ मध्ये एक कोटी रुपये खचूर्न पाच ठिकाणी दहा तर दुसऱ्या टप्प्यात तीन कोटी रुपयांच्या निधीतून २० ठिकाणी ४० असे एकूण २०२१ पर्यंत शहरात वेगवेगळ्या २५ सार्वजनिक ठिकाणी ५० ई-टॉयलेट उभारले होते.
0 Comments