Hot Posts

6/recent/ticker-posts

यंदा आषाढी वारीच्या नियोजनासाठी सुमारे 85 कोटी रुपये खर्च - जिल्हाधिकारी

 यंदा आषाढी वारीच्या नियोजनासाठी सुमारे 85 कोटी रुपये खर्च - जिल्हाधिकारी






सोलापूर (कटूसत्य वृत्त):- यंदा आषाढी वारीच्या नियोजनासाठी सुमारे 85 कोटी रुपये खर्च झाला असून, वारीसाठीच्या प्रत्येक नियोजनाची डॉक्युमेंटरी तयार करणार आहे. त्यामुळे पुढील काळात अधिकारी, कर्मचार्‍यांना वारीचे नियोजन करताना ती उपयोगी पडेल, अशी माहिती जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी दिली.

पाऊसमान चांगले झाल्याने वारीत सुमारे 28 लाख वारकरी सहभागी झाले होते. एआय तंत्रज्ञानाच्या वापर करून वारकर्‍यांची संख्या मोजण्यात आली. मंदिर परिसर नो व्हेईकल झोन करण्यात आला. व्हीआयपी दर्शन बंद केल्याने भाविकांना त्रास न होता विठ्ठलाचे दर्शन घडल्याचे जिल्हाधिकारी आशीर्वाद यांनी सांगितले.

वारीसाठी ग्रामविकास विभागाकडून 45 लाख, जिल्हा नियोजन समितीमधून 12 लाख, नगरविकास विभागाकडून 28 कोटी असा एकूण सुमारे 85 कोटी रुपयांचा खर्च करण्यात आला.आषाढी वारीत लाखो वारकर्‍यांची गर्दी असल्याने यंदा जिल्हा प्रशासनाने फोर जीच्या हायटेक जमान्यात टू जी मोबाईलचा वापर करत अधिकारी - कर्मचार्‍यातील संवाद वाढविला. त्यासाठी एक हजार रुपये किमतीचे इंटरनेट सुविधा नसलेले 140 मोबाईल खरेदी करण्यात आले. वॉकीटॉकीसह या टू जी मोबाईल उपयुक्त ठरले. विशेष या मोबाईलला इंटरनेट नसल्याने आणि मोबाईल अधिक वेळ चॉर्ज राहत असल्याने त्याचा फायदा झाल्याचे जिल्हाधिकारी आशीर्वाद यांनी सांगितले.

Reactions

Post a Comment

0 Comments