Hot Posts

6/recent/ticker-posts

आम आदमी पार्टी महापालिका निवडणूक स्वबळावर लढवणार

 आम आदमी पार्टी महापालिका निवडणूक स्वबळावर लढवणार




घरपट्टी हाफ, पाणी पट्टी माफचा दिला नारा

सोलापूर (कटूसत्य वृत्त):- आम आदमी पार्टी सोलापूर महानगरपालिकेची निवडणूक स्वबळावर लढविणार आहे. घरपट्टी हाफ आणि पाणी पट्टी माफ, दररोज  600 लिटर मोफत पाणी असा नारा या निवडणुकीत देण्यात येत आहे, अशी माहिती प्रदेश संघटन मंत्री ॲड. सागर पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली.
       सर्वोच्च न्यायालयाने स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीचे आदेश दिले आहेत. त्याप्रमाणे आम आदमी पार्टीचे राष्ट्रीय संयोजक अरविंद केजरीवाल यांनी महाराष्ट्रात प्रकाश जरवाल यांची प्रभारी म्हणून नियुक्ती केली आहे. त्याच आदेशानुसार आम आदमी पार्टी महाराष्ट्रात सर्व स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका महाराष्ट्र राज्य अध्यक्ष अजित फाटके यांच्या नेतृत्वाखाली लढविणार आहे. सोलापुरातही आम आदमी पार्टी महापालिका, पंचायत समिती, जिल्हा परिषद  या निवडणुकीत सर्व जागा स्वबळावर लढविणार आहे. सोलापूर शहरात आठ दिवसाआड पाणीपुरवठा आणि इतर जीवनावश्यक सुविधांसाठी जनता झगडत आहे. त्याच अनुषंगाने घरपट्टी हाफ, पाणीपट्टी माफ आणि दररोज सहाशे लिटर मोफत पाणी असा नारा घेऊन ही निवडणूक लढविण्यात येणार आहे. सोलापुरातील व्यवसाय, शिक्षण, आरोग्य या मूलभूत गोष्टीसाठी बदल घडविण्याचा उद्देश आम आदमी पार्टीचा असल्याचे ॲड. सागर पाटील यांनी सांगितले.
      या पत्रकार परिषदेत ॲड. खतीब वकील, जुबेर हिरापुरे, श्रीकांत वाघमारे,  सतीश लोंढे, सुचित्रा वाघमारे आदी उपस्थित होते.
Reactions

Post a Comment

0 Comments