हजारों नेत्ररुग्णांचे आशिर्वाद आणि सदिच्छा बबनदादा शिंदे यांच्या पाठीशी - व्हा.चेअरमन अशोक लुणावत - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Tuesday, July 1, 2025

हजारों नेत्ररुग्णांचे आशिर्वाद आणि सदिच्छा बबनदादा शिंदे यांच्या पाठीशी - व्हा.चेअरमन अशोक लुणावत

 हजारों नेत्ररुग्णांचे आशिर्वाद आणि सदिच्छा बबनदादा शिंदे यांच्या पाठीशी - व्हा.चेअरमन अशोक लुणावत



माढा (कटूसत्य वृत्त):- मागील 15 ते 16 वर्षांपासून माजी आमदार बबनराव शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली जागतिक कीर्तीचे नेत्ररोगतज्ञ पद्मश्री डॉ.तात्याराव लहाने व डॉ.रागिणी पारेख यांच्या सहकार्याने माढेश्वरी अर्बन बँक व विठ्ठलराव शिंदे बहुउद्देशीय सांस्कृतिक मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने नेत्र शिबिराचे आयोजन केले जात आहे. त्यामध्ये आजतागायत 23 हजारांहून अधिक नेत्र रुग्णांची मोफत तपासणी व 7500 हून अधिक रुग्णांच्या यशस्वी मोतिबिंदू शस्त्रक्रिया केल्या आहेत.हे हजारों नेत्ररुग्ण व त्यांचे नातेवाईक यांचे आशीर्वाद आणि सदिच्छा बबनदादा यांच्या पाठीशी आहेत. मतदारसंघातील गोरगरीब जनता व कष्टकरी शेतकऱ्यांचेही अपार प्रेम व श्रद्धा दादांवर असल्याने त्यांच्यावरील शस्त्रक्रिया निश्चितच यशस्वी होऊन ते लवकरात लवकर बरे होतील असे प्रतिपादन संकल्प फाऊंडेशनचे चेअरमन तथा माढेश्वरी अर्बन बँकेचे व्हा.चेअरमन अशोक लुणावत यांनी केले.

ते माजी आमदार बबनराव शिंदे यांच्यावरील हृदय ट्रान्सप्लांट शस्त्रक्रिया यशस्वी होऊन ते लवकरात लवकर बरे व्होवोत यासाठी संकल्प फाऊंडेशन संचलित,माढा येथील कर्मयोगी आमदार बबनदादा शिंदे नेत्रालयाच्या वतीने माढेश्वरी देवीला साकडे घालताना बोलत होते.

यावेळी संकल्प फाऊंडेशनचे चेअरमन तथा माढेश्वरी अर्बन बँकेचे व्हा.चेअरमन अशोक लुणावत यांनी माढेश्वरी देवीच्या प्रतिमेचे पूजन करून मनोभावे आरती करुन माजी आमदार बबनराव शिंदे यांच्यावरील शस्त्रक्रिया यशस्वी होऊन ते लवकरात लवकर बरे व्होवोत यासाठी साकडे घातले.
प्रास्ताविक विठ्ठलवाडीचे आदर्श शिक्षक राजेंद्र गुंड यांनी केले.

यावेळी संकल्प फाऊंडेशनचे चेअरमन अशोक लुणावत व नेत्ररोगतज्ञ डॉ.गणेश इंदूरकर यांच्या हस्ते यशस्वी मोतिबिंदू शस्त्रक्रिया केलेल्या नेत्ररुग्णांचा सत्कार करुन दीर्घायुष्य लाभावे म्हणून शुभेच्छा दिल्या.

-चौकट - यावेळी शनिवारी 28 जून रोजी यशस्वी मोतिबिंदू शस्त्रक्रिया झालेल्या मंगल जाधव,छाया जाधव,विठ्ठल शिंदे,उदय शहा,रतन भांगे,मुनेर जहागिरदार,वर्षा भोसले, अनिता राऊत,मंदाताई धूमाळ, राजाराम लटके या 10 नेत्ररुग्णांनी माजी आमदार बबनराव शिंदे यांच्यावरील शस्त्रक्रिया यशस्वी होऊन ते लवकरात लवकर बरे व्होवोत यासाठी माढेश्वरी देवीची पूजा व आरती करुन साकडे घातले.

यावेळी नेत्ररोगतज्ञ डॉ.गणेश इंदूरकर,माढेश्वरी बँकेचे संचालक गणेश काशीद,मुख्य कार्यकारी अधिकारी दत्तात्रय मुळे,निलेश कुलकर्णी,शिरीष बारबोले,गणेश कारंडे,बिभिषण थोरे,विनायक जाधव,लक्ष्मण शिंदे,अमोल मारकड,प्रमोद शिंदे, शिवाजी घाडगे,विक्रम पाटील,समाधान भांगे,धनंजय शहाणे,रवींद्र डोंगरे,संदीप गोरे, अक्षय कवठे,सागर जाधव, विजय मुळे,सर्जेराव गडेकर यांच्यासह ग्रामस्थ व महिला उपस्थित होत्या.

सूत्रसंचालन आदर्श शिक्षक राजेंद्र गुंड यांनी केले.आभार मुख्य कार्यकारी अधिकारी दत्तात्रय मुळे यांनी मानले.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages