परिचारिका आरोग्य सेवा प्रणालीमध्ये महत्त्वाची भूमिका बजावतात- ब्रिजमोहन फोफलिया
सोलापूर (कटूसत्य वृत्त):- विजापूर येथील भारतीय लिंगायत एज्युकेशनल असोसिएशन विजापूर कॉलेज ऑफ नर्सिंग तिकोटा एज्युकेशनच्या अंतिम वर्षातील बी.एस.सी. 50 नर्सिंग प्रशिक्षणार्थीं परिचारिका व शिक्षकांनी साेरेगाव येथील ब्रिजधाम वृद्धाश्रमाचा शैक्षणिक अभ्यास दौरा केला.
यावेळी ब्रिजधाम वृद्धाश्रमाचे संस्थापक ब्रिजमोहन फोफलिया यांनी सदर विद्यार्थ्याचे स्वागत करून मानवी जीवनात परिचारिकांच्या सेवेबाबतचे महत्व विशद केले.
यावेळी पुढे बोलताना फोफलिया यांनी परिचारिके कडून होणारी रुग्ण सेवा खूप मोठी आहे, ते मानवतेचे सर्वात मोठे कार्य आहे, जे काम कुटुंबातील भाऊ, बहिणी, आई-वडील करू शकत नाहीत, ते परिचारिका करते, रुग्णाला स्वच्छ ठेवणे, त्याची लघवी व विष्ठा उचलणे, ही सेवा ती निसंकोच करते. गंभीर रुग्ण जवळ जायला नातेवाईक देखील घाबरतात मात्र एक परिचारिकाच असते जी अशा रुग्णांची देखील आपुलकीने सेवा सुश्रुषा करते.
जगात आजारपणापेक्षा कुठलेच दुःख मोठे नाही म्हणूनच परिचारिकेची रुग्णसेवा मानवसेवेत श्रेष्ठ असल्याचे प्रतिपादन फोफलिया यांनी केले.
यावेळी महाविद्यालयाच्या आकाश जाधव ,अजूर नवनाथ ,प्रशांत ईश्र्वर ,इराण्णा निपाणी या शिक्षकांनी आपण विद्यार्थ्यांना केलेले मौलिक मार्गदर्शन ,त्यांना सदग्रहस्त म्हणून जगण्यासाठी जीवनात प्रेरणादायी ठरणार असल्याचे सांगून सर्व परीशिक्षणार्थी विद्यार्थ्यांनी व शिक्षकांनी तेथून निरोप घेतला.
0 Comments