Hot Posts

6/recent/ticker-posts

दौंड-कुलबर्गी-दौंड रेल्वेला तीन महिन्यांची मुदतवाढ

 दौंड-कुलबर्गी-दौंड रेल्वेला तीन महिन्यांची मुदतवाढ

 

खा. धैर्यशील मोहिते-पाटील यांच्या प्रयत्नांना यश

अकलूज (कटूसत्य वृत्त):- दौंड-कुलबर्गी-दौंड रेल्वेची सेवा बंद होणार होती, मात्र खासदार धैर्यशील मोहिते-पाटील यांच्या प्रयत्नांमुळे तीन महिन्यांची मुदतवाढ मिळाली आहे. पुणे येथे मध्य रेल्वेच्या महाप्रबंधकांशी झालेल्या बैठकीत खासदार मोहिते-पाटील यांनी ही रेल्वे सेवा नियमित चालवण्याची आणि मुदतवाढ देण्याची मागणी केली होती. त्यांच्या या मागणीला यश आले असून, ही रेल्वे पुढील तीन महिने सुरू राहणार आहे.

या रेल्वे सेवेमुळे दौंड,कुर्डूवाडी,माढा,सोलापूर, कुलबर्गी आणि परिसरातील प्रवाशांना मोठा दिलासा मिळाला आहे. खासदार मोहिते-पाटील यांनी प्रवाशांच्या सोयीसाठी आणि स्थानिकांच्या मागण्यांचा विचार करून हा प्रश्न लावून धरला. त्यांच्या या प्रयत्नांचे स्थानिक नागरिकांनी आणि प्रवाशांनी स्वागत केले. खासदार मोहिते-पाटील यांनी ही दौंड कुलबर्गी दौंड सेवा कायमस्वरूपी सुरू राहावी यासाठी रेल्वे बोर्डाकडे प्रयत्न सुरू ठेवणार असल्याचे सांगितले.
Reactions

Post a Comment

0 Comments