थकबाकीदारांवर कारवाईचे आयुक्तांचे आदेश
सोलापूर : (कटूसत्य वृत्त):- सलगर वस्ती, फ्री सेटलमेंट कॉलनीत आयुक्त डॉ. सचिन ओम्बासे
यांनी मिळकत कर संदर्भात मिळकतीची पाहणी करून थकबाकीदारांवर कारवाई करण्याचे
आदेश करसंकलन विभागास दिले.
यावेळी त्यांनी परिसरातील नागरिक व व्यावसायिक मिळकतधारकांची भेट घेऊन मिळकत कर भरण्याचे आवाहन केले. तपासणी दरम्यान अनेक जणांनी मिळकतदर भरला नाही थकबाकी ठेवण्याचे प्रमाण मोठ्या प्रमाणात आहे. त्यामुळे अशा नागरिकांना आणि आस्थापनांना तात्काळ नोटीस बजावून मिळकत कर भरण्यास निर्देश संबंधित विभागाला देण्यात आले. खासगी आस्थापना, शाळा, दुकान, मेडिकल, दवाखाने याची सखोल तपासणी करण्याचे आदेश दिले आहेत, ज्या ठिकाणी अधिकृत मंजुरीशिवाय वाढीव आयुक्तांनी यावेळी दिले. महसूल वसुली वाढविण्यासाठी व नागरी सुविधा सुरळीतपणे पुरविण्यासाठी महापालिकेने मिळकत कर वसुलीला गती दिली असून नागरिकांनी वेळेवर
कर भरून जबाबदार नागरिकत्वाचे पालन करावे, असे आवाहन आयुक्त डॉ. सचिन ओम्बासे यांनी केले.
बांधकाम करण्यात आले आहे. अशा वाढीव बांधकामांवर कायदेशीर कार्यवाही करत त्यांना वाढीव मिळकत कर लावण्याच्या सूचना केल्या. अशा सूचनाही त्यांनी दिल्या. ज्या खासगी आस्थापनांनी, दुकान यांना अनेक वेळा सूचना मिळाल्यानंतरही मिळकत कर भरलेला नाही, अशा आस्थापनांची नोंद घेऊन त्यांना अंतिम नोटीस पाठवून, ठराविक मुदतीत कर न भरल्यास संबंधित आस्थापनां सील
करण्याची कारवाई करण्याचे आदेश यावेळी उपायुक्त आशिष लोकरे यांच्यासह मालमत्ता विभागातील अधिकारी कर्मचारी यावेळी उपस्थित होते.
0 Comments