अडीच लाख विद्यार्थ्यांची अकरावी प्रवेशाची यादी जाहीर
विद्यार्थ्यांना २१ जुलैपर्यंत घेता येणार प्रवेश
सोलापूर (कटूसत्य वृत्त):- इयत्ता अकरावी प्रवेशाची दुसरी गुणवत्ता यादी (गुरुवारी) जाहीर झाली आहे. त्यातून दोन लाख ५१ हजार ८०४ विद्यार्थ्यांना प्रवेश मिळणार आहे.अकरावी प्रवेशाच्या दुसऱ्या गुणवत्ता यादीतून सोलापूरसह राज्यभरातील विज्ञान शाखेच्या एक लाख २९ हजार ३५ विद्यार्थ्यांसह वाणिज्य शाखेच्या ६९ हजार ४४२ आणि कला शाखेच्या ५३ हजार ३२७ विद्यार्थ्यांना प्रवेश मिळणार आहेत. आतापर्यंत सुमारे सव्वापाच लाख विद्यार्थ्यांनी अकरावीसाठी प्रवेश घेतले आहेत. आता दुसऱ्या गुणवत्ता यादीतून पसंतीक्रमाचे महाविद्यालय मिळालेल्या विद्यार्थ्यांना उद्यापासून (ता. १८) २१ जुलैपर्यंत प्रवेश घेता येणार आहेत. ज्या विद्यार्थ्यांना त्यांच्या पसंतीनुसार महाविद्यालय मिळाले नाही, त्यांना २१ जुलैनंतर पुन्हा पसंतीक्रम बदलता येतील. २३ जुलैला रिक्त जागा प्रसिद्ध होतील आणि त्यानंतर जुलैअखेर तिसरी गुणवत्ता यादी जाहीर होणार आहे.
0 Comments