Hot Posts

6/recent/ticker-posts

जिद्द, चिकाटी आणि प्रामाणिक अभ्यासाच्या बळावर अॅड. सुयश बाळासाहेब नवले विधी शाखेत प्रथम

 जिद्द, चिकाटी आणि प्रामाणिक अभ्यासाच्या बळावर अॅड. सुयश बाळासाहेब नवले विधी शाखेत प्रथम




घरी वडील अॅड. बाळासाहेब नवले व आई अॅड. सौ. पद्मश्री नवले, दोघेही वकील, मुलगा शिकून चांगला वकील व्हावा म्हणून नवले दांम्पत्यांनी सुयश याला लहानपणापासूनच चांगले शिक्षण मिळावे यासाठी प्रयत्न केले. सुयश यांनीही आई-वडिलांचा विश्वास सार्थ ठरवत शैक्षणिक कारकिर्दीत घवघवीत यश मिळविले व विधी शाखेच्या वर्षात प्रथमश्रेणीत विशेष प्राविण्यासह यश मिळवून प्रथम येण्याचा मान मिळविला.

शाळेत असतांना पोरानं चुणुक दाखवली, चौथी, सातवी, दहावी आणि बारावी अव्वल गुणांनी उत्तीर्ण होऊन वकील होण्याचे स्वप्न उराशी बाळगले आणि विद्येचे माहेरघर असलेल्या पुण्यातील मराठवाडा मित्र मंडळाचे शंकरराव चव्हाण लॉ कॉलेज मध्ये विधी शाखेची पदवी प्रथम श्रेणीत विशेष प्राविण्यासह उत्तीर्ण होऊन प्रथम क्रमांक मिळविला.

विधी शाखेचा अभ्यास करत असतांनाच टॅक्सेसन-लॉ व सायबर लॉ अशा अतिशय महत्वाचे कोर्सेस मध्ये विशेष प्राविण्य मिळवून विद्यापीठात चौथ्या क्रमांकाने उत्तीर्ण झाला. एवढेच नव्हे तर महाराष्ट्र शासनाच्या विधी व न्याय विभागामार्फत कायदयाच्या विद्यार्थ्यांना कायदेविषयक कामाचा अनुभव मिळावा यासाठी चालविल्या जाणा-या "लेजिस्लेशन इंटरर्नशिप प्रोग्राम " "महाराष्ट्र शासन" मध्ये सुयश यांची निवड झाली व त्यात त्यांनी कायदे तयार करणे, कायदे दुरूस्ती व कायदे विषयक संशोधन यावर विशेष अभ्यास केला आणि त्या अंतर्गत विधी मंडळाच्या पावसाळी अधिवेशनात सहभाग नोंदविला.

तसेच विविध राष्ट्रीय व राज्यस्तरीय मुट कोर्ट (अभिरुप न्यायालय) स्पर्धेत वेळोवेळी भाग घेऊन त्यांनी देशपातळीवर प्रथम व द्वितीय क्रमांक मिळविला व त्यांना १७ व्या कै. अॅड. डी व्ही जयभावे मेमोरियल नॅशनल लेवल मूट ट्रॉयल मध्ये उत्तम युक्तीवाद केलेला अभिवक्ता म्हणून प्रथम क्रमांकाचा बहुमान मिळाला. या व्यतिरिक्त त्यांनी कायदयाच्या विविध विषयात लिहिलेले २ शोध निबंध प्रसिध्द झाले आहेत व शिक्षण घेतांना स्टुंडट कौन्सिलचा सदस्य म्हणून त्यांनी उत्तम नेतृत्व केले. सुयश यांनी मिळविलेल्या घवघवीत यशाचे समाजात विविध स्तरावर कौतुक होत आहे.


Reactions

Post a Comment

0 Comments