मंगळवेढा येथे श्री संत बसवेश्वर महाराज यांचे स्मारक प्रस्तावित आहे. त्यासाठी शासनाच्या नावे असलेल्या कृष्णा तलावाची जवळपास २५ एकर जमीन स्मारकासाठी देण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा प्रशासनाने दिली आहे. तर पंढरपूर येथे होणाऱ्या श्री संत नामदेव महाराज स्मारकासाठी रेल्वे विभागाची १५ एकर जागा मिळालेली असून, त्या ठिकाणी स्मारकाचा आराखडा तयार करुन लवकरच कामाला सुरुवात केली जाणार आहे. तर अरण, ता. माढा येथील श्री संत सावता माळी संजीवन समाधी या तीर्थक्षेत्राला नुकताच 'अ' दर्जा मिळाला आहे. त्या ठिकाणी शासनाच्या वतीने १५० कोटी रुपयांच्या कामांना मंजूरी देण्यात आलेली आहे. त्यामुळे त्या ठिकाणी नव्याने काही गोष्टी निर्माण करण्यासाठी किमान १२ एकर जमीनीचे भू संपादन करण्यात येणार आहे. त्यासाठी लवकरच अधिकाऱ्यांची नेमणूक करुन त्या स्मारकासाठी लागणारी जमीन अधिग्रहीत केली जाणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी दिली आहे. या प्रस्तावित स्मारकांच्या समित्या अनेक ठिकाणी गठीत झालेल्या नाहीत, त्या झाल्यानंतर या स्मारकांच्या कामांना गती मिळेल असा विश्वास जिल्हा प्रशासनाच्या वतीने व्यक्त करण्यात आला आहे.
अरण येथील श्री संत सावता माळी स्मारकासाठी नव्याने जमीन संपादित करण्यात येणार मंगळवेढ्यातील श्री संत बसवेश्वर स्मारकासाठी कृष्णा तलावाची २५ एकर जमीन देण्यात येणार असून ती सध्या शासनाच्या मालकीचीच आहे. तर श्री संत नामदेव महाराज स्मारकासाठी पंढरपूरात रेल्वे विभागाकडून १५ एकर जागा मिळालेली आहे. माढा तालुक्यातील अरण येथील श्री संत सावता माळी स्मारकासाठी नव्याने १२ एकर जमीन संपादीत करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी दिली आहे.
0 Comments