Hot Posts

6/recent/ticker-posts

नेताजी प्रशालेत पालक-शिक्षक सभा उत्साहात

 नेताजी प्रशालेत पालक-शिक्षक सभा उत्साहात




सोलापूर (कटूसत्य वृत्त):- नीलम नगर येथील नेताजी सुभाषचंद्र बोस प्रशालेत पालक-शिक्षक सभा २२९ पालकांच्या उपस्थितीत पार पडली. सभेच्या अध्यक्षस्थानी शाळेचे मुख्याध्यापक रविशंकर कुंभार होते. व्यासपीठावर शाळेचे पर्यवेक्षक गौरीशंकर आळंगे, पालक शिक्षक संघाचे सदस्य सिद्धाराम खानापूरे, काशिनाथ माळगोंडे, विठ्ठल कुंभार, राजेंद्र मुलगे, जयश्री बिराजदार आदी उपस्थित होते.
प्रथम क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक पालक शिक्षक संघटनेचे सचिव गणपती पाटील यांनी केले.यावेळी पालक शिक्षक संघाचे नवीन कार्यकारिणीची निवड करण्यात आली.मुख्याध्यापक रविशंकर कुंभार (पदसिद्ध अध्यक्ष), राजशेखर घंटे(उपाध्यक्ष), गणपती पाटील (सचिव),वैशाली अभंगे ( सहसचिव) आदीसह वीस तुकड्यांचे पालक व वर्गशिक्षकांची पालक शिक्षक संघाच्या कार्यकारिणी म्हणून यांची निवड करण्यात आली.यासभेत शाळेतील स्वच्छता, मध्यान्ह भोजनाची गुणवत्ता,  विद्यार्थ्यांच्या आरोग्याकडे विशेष लक्ष, त्रैमासिक पालक सभा, करिअर मार्गदर्शन, वक्तृत्व स्पर्धा, विज्ञान प्रकल्प,डिजिटल शिक्षण, गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार आदी विषयांवर चर्चा करण्यात आली.
 ज्येष्ठ शिक्षक काशिनाथ माळगोंडे यांनी शालेय शिस्तीचे महत्त्व विषद केले तर राजेंद्र मुलगे यांनी शालेय व बाह्य परीक्षासंबधी माहिती सांगितली.पर्यवेक्षक गौरीशंकर आळंगे यांनी प्रशासकीय कामकाजात विद्यार्थ्यांचे लागणारे आवश्यक कागदपत्रांची माहिती देऊन शाळेतील परीक्षा,सहल, सांस्कृतिक, स्वच्छता आदी समित्यांची कार्य व जबाबदाऱ्या याविषयीही माहिती सांगितली. मुख्याध्यापक रविशंकर कुंभार म्हणाले, विद्यार्थ्यांचे  शालेय शिस्त, संस्कार, शैक्षणिक गुणवत्ता यासह स्काऊट-गाईड उपक्रम, गणवेश, वाचन-लेखन व वक्तृत्व कौशल्य वाढवण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे सांगितले. विद्यार्थ्यांसाठी शासनाच्यावतीने येणाऱ्या सर्व योजना शाळेत राबविण्यात येतात. सर्व पालकांनी सहकार्य करावे असे आवाहन केले.
सभेत पालकांनी विचारलेल्या सर्व शंकांचे निरसन करण्यात आले.पालक शाळेच्या उपक्रमांविषयी समाधान व्यक्त केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विश्वाराध्य मठपती यांनी केले तर शिवकुमार शिरूर यांनी आभार मानले.

Reactions

Post a Comment

0 Comments