Hot Posts

6/recent/ticker-posts

निवृत्तीनाथ महाराज पालखी टेंभूर्णीतून मार्गस्थ

निवृत्तीनाथ महाराज पालखी टेंभूर्णीतून मार्गस्थ 



टेंभुर्णी (कटूसत्य वृत्त):- त्रिंबकेश्वर जिल्हा नाशिक येथून पंढरीचा पांडुरंग विठ्ठल माऊली चे दर्शन घेण्यासाठी असंख्य भक्तांसह निघालेल्या विश्र्वगुरू संतश्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराज पालखी सोहळ्याचे बुधवारी सकाळी ९ वा करमाळा तालुक्यातून माढा तालुक्यातील फुटजवळगाव येथे आगमन झाले यावेळी माढ्याचे तहसीलदार संजय भोसले, टेंभुर्णी चे पोलीस निरीक्षक नारायण पवार यांनी स्वागत केले.
  विश्र्वगुरू संतश्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराज पालखी ही मानाच्या पालखीपैकी एक पालखी असून ती नाशिक जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर येथून येते या पालखीमध्ये जवळपास १०० दिंड्यासह एकूण ५० ते ६० हजार वारकरी आहेत.या पालखीचे माढा तालुक्यातील आगमन होताच फुटजवळगाव,अकोले खुर्द, टेंभूर्णी,वेणेगाव मधील नागरिकांनी ठिकठिकाणी पुष्पहार अर्पण करून, फटाक्यांची आतिषबाजी करुन विठ्ठलनामाचा जयघोष करीत स्वागत केले.लहान थोर मंडळीनी दर्शन घेतले.बुधवारचा मुक्काम अकोले बुद्रुक या गावात मुक्काम होता यावेळी भजन  किर्तनातून समाजप्रबोधन केले.आज गुरुवारी दुपारी पंढरपूर आणि माढा तालुक्याच्या सिमेवर असलेल्या घोटी पाटी (चांभार विहिर ) या ठिकाणी सालाबादप्रमाणे गोल रिंगण होणार आहे. या रिंगण सोहळ्याह दरवर्षी हजारो भाविकांची उपस्थिती असते.

बुधवार रोजी निवृत्तीनाथ महारांचे पालखीसह पहाटेपासून शेकडो दिंड्या टेंभूर्णी शहरातून पंढरपूर च्या दिशेने जात होत्या यामुळे टेंभुर्णी शहरात पुढील पाच तारखेपर्यंत वारक-यांची मांदियाळी असते.या वारकऱ्यांची टेंभुर्णी कर घरोघरी मनोभावे सेवा करून भोजन निवासाची व्यवस्था केली जाते.यामुळे आठवडाभर शहरात विठ्ठलाचा  जागर केला जातो.भक्तीमय वातावरणात तल्लीन होते.

Reactions

Post a Comment

0 Comments