प्रभाग २२ येथे रस्ता काँक्रिटीकरण कामाचा शुभारंभ - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Saturday, July 5, 2025

प्रभाग २२ येथे रस्ता काँक्रिटीकरण कामाचा शुभारंभ

 जनसेवेसाठी नेहमी तत्पर- किसन जाधव


प्रभाग २२ येथे रस्ता काँक्रिटीकरण कामाचा शुभारंभ



सोलापूर (कटूसत्य वृत्त):- सोलापूर महानगरपालिका प्रभाग क्रमांक २२ मधील नागरिकांना मूलभूत सुविधा मिळाव्या यासाठी विकास कामांची खैरात केली. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार प्रदेशाध्यक्ष तथा खासदार सुनील तटकरे यांच्या सहकार्यातून कार्यसम्राट नगरसेवक नागेश गायकवाड यांच्या प्रयत्नाने प्रभागाचा सर्वांगीण विकास साधण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला जनसेवेसाठी आम्ही नेहमी तत्पर असल्याचे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेश उपाध्यक्ष किसन जाधव यांनी रस्ता काँक्रिटीकरण शुभारंभ प्रसंगी व्यक्त केलं. सोलापूर महानगरपालिका प्रभाग क्रमांक २२ येथे महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान या योजनेअंतर्गत १७ लाख ३६ हजार ३६५ रुपये खर्चित रामवाडी अंबाबाई मंदिर लगत आकाश जाधव ते गवळी घरापर्यंत रस्ता कॉंक्रिटीकरण कामाच्या शुभारंभ करण्यात आलं. दरम्यान यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेश युवक सरचिटणीस चेतन नागेश गायकवाड,राजश्री माळगे, लता गायकवाड, शारदा जाधव, शोभा जाधव, सुनील गायकवाड, समरीन शेख, जैतुनबी शेख, लक्ष्मी माळवे, गंगु गायकवाड, अंजु मुल्ला, यल्लमा केंगार, चंदाताई भोसले, रेखाताई भोसले, सुरेखा कतनाळी, लता भोसले, मदिना मकानदार, नागनाथ गायकवाड, काजी सर, चांदसाब कोलारकर, रेशन दुकानदार पांडुरंग जाधव, मौला शेख,शैलेश जाधव फेटेवाले, विठ्ठल गायकवाड चव्हाण वस्ती, हसन शेख,गोपी जाधव सर, सागर गायकवाड, अनिल गायकवाड, जितेश भोसले,आलम मुल्ला, अनिस जाधव, फिरोज पठाण, वसंत कांबळे, माणिक कांबळे, महादेव राठोड, आनंद गाडेकर आदींच्या उपस्थितीत पूजन होऊन या रस्ता कॉंक्रिटीकरण कामाचा शुभारंभ करण्यात आला. कार्यसम्राट नगरसेवक नागेश गायकवाड आणि किसन जाधव यांनी प्रभाग २२ च्या सर्वांगीण विकासासाठी ते नेहमी तत्पर असतात नागरिकांना अत्याधुनिक सुविधा मिळाव्यात यासाठी ते नेहमी अग्रेसर असतात. नागरिकांच्या अडीअडचणीसाठी ते प्राधान्याने अग्रस्थानी असतात अशा भावना यावेळी उपस्थित स्थानिक रहिवाशांनी व्यक्त केले. या रस्ता कॉंक्रिटीकरण शुभारंभ प्रसंगी प्रभागातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages