Hot Posts

6/recent/ticker-posts

मनोरमा परिवाराच्या वतीने "पाऊले चालती पंढरीची वाट” विशेष कार्यक्रम

 मनोरमा परिवाराच्या वतीने "पाऊले चालती पंढरीची वाट” विशेष कार्यक्रम





सोलापूर (कटूसत्य वृत्त):- महाराष्ट्र साहित्य परिषद, पुणे शाखा पश्चिम (मनोरमा), सोलापूर आणि मनोरमा साहित्य मंडळी, सोलापूर यांच्या संयुक्त विद्यमाने आषाढी एकादशीनिमित्त "पाऊले चालती पंढरीची वाट"  हा विशेष कार्यक्रम रविवार, दि. ६ जुलै २०२५ रोजी सकाळी १०.३० वाजता खालील मान्यवरांच्या उपस्थितीत होत आहे.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी श्रीकांत मोरे (ज्येष्ठ साहित्यिक तथा अध्यक्ष मसाप पुणे शाखा प. सोलापूर) राहणार असून प्रमुख पाहुणे म्हणून प्रशांत जोशी  (उपसंपादक, दै. संचार) आहेत. प्रमुख उपस्थिती म्हणून सौ. शोभा मोरे (अध्यक्षा, मनोरमा सखी मंच, सोलापूर), सौ. अस्मिता गायकवाड (कार्याध्यक्ष, मसाप पुणे शाखा प. सोलापूर), प्रा. राजशेखर शिंदे, (कार्यवाह तथा साहित्य पुरस्कार निवड समिती अध्यक्ष), संतोष सुरवसे (कार्यवाह, मसाप पुणे शाखा प. सोलापूर) आदी उपस्थित राहणार आहेत.
कार्यक्रम सर्वांसाठी खुला आहे. कार्यक्रमाचे स्थळ मनोरमा सांस्कृतिक भवन, बेन्नूर नगर, आरटीओ ऑफिससमोर, विजापूर रोड, सोलापूर येथे असून तरी आपण कार्यक्रमास उपस्थित राहावे, असे आवाहन महाराष्ट्र साहित्य परिषद पुणे शाखा प. (मनोरमा) सोलापूर व मनोरमा साहित्य मंडळी सदस्य डॉ. सुमित मोरे, डॉ. मिताली मोरे, डॉ. ऋचा मोरे पाटील, सौ. उज्ज्वला साळुंखे, सौ. शिल्पा कुलकर्णी (कोषाध्यक्ष / सचिव) सुनील पाटील (सहसचिव), सौ. कविता कुलकर्णी यांच्या वतीने करण्यात आले आहे. या कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण अस्मिता व्हीजन चॅनेल क्र.134 वरून होईल.

Reactions

Post a Comment

0 Comments