रत्नप्रभादेवी मोहिते पाटील यांच्या स्मृती प्रित्यर्थ गुणवंत विद्यार्थी,आदर्श माता यांचा सत्कार
नातेपुते (कटूसत्य वृत्त):- श्रीमती रत्नप्रभादेवी मोहिते पाटील प्रशाला नातेपुते मध्ये स्वर्गीय श्रीमती रत्नप्रभादेवी मोहिते पाटील स्मृतीप्रित्यर्थ गुणवंत विद्यार्थी व आदर्श माता यांचा सत्कार समारंभ घेण्यात आला.कार्यक्रमासाठी स्थानिक प्रशाला समितीचे सभापती रामचंद्र गायकवाड, सदस्य बाळासाहेब सणस, उत्कर्ष शेटे, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्षा मिनलताई कुलकर्णी, मा. सरपंच ग्रामपंचायत नातेपुते सुरेखाताई उराडे ,प्रशालेचे मुख्याध्यापक विजय उबाळे प्रमुख मान्यवर म्हणून उपस्थित होते मान्यवरांच्या शुभहस्ते श्रीमती रत्नप्रभादेवी मोहिते पाटील यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले तसेच इयत्ता दहावी मध्ये गुणवंत आलेले विद्यार्थी प्रणव संजय दुधाळ, यश प्रमोद दराडे, स्नेहल भाऊ वनवे इयत्ता बारावी(कला शाखा) मधील प्रशालेच्या गुणवंत विद्यार्थिनी अनुराधा अजिनाथ कर्चे, ऐश्वर्या रामचंद्र रानगट, रिद्धी हरिदास कर्चे तसेच आदर्श माता यांना रत्नाई पुरस्कार देऊन वरील मान्यवरांच्या शुभहस्ते सन्मानित करण्यात आले.सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन भाऊ वनवे यांनी केले. अनुमोदन व आभार जितेंद्र शिंदे यांनी मानले.
0 Comments