Hot Posts

6/recent/ticker-posts

शिक्षणाधिकाऱ्यांच्या दालनाला काँग्रेस तालुकाध्यक्षांकडून टाळे

 शिक्षणाधिकाऱ्यांच्या दालनाला काँग्रेस तालुकाध्यक्षांकडून टाळे
माध्यमिक विभागातील सावळागोंधळ चव्हाट्यावर
सोलापूर (कटूसत्य वृत्त):- जिल्हा परिषदेच्या माध्यमिक शिक्षण विभागातील बेबंदशाही कारभारावर संताप व्यक्त करीत जिल्हा परिषदेच्या कृषी समितीचे माजी सभापती तथा काँग्रेसचे अक्कलकोट तालुकाध्यक्ष मल्लिकार्जुन पाटील यांनी सोमवारी माध्यमिक शिक्षणाधिकारी सचिन जगताप यांच्या दालनाला कुलूप ठोकून निषेध नोंदविला.
सहा-सहा महिने कामे होत नसल्याने वैतागलेल्या पाटील यांनी सायंकाळी पाच वाजण्याच्या
सुमारास शिक्षणाधिकाऱ्यांच्या दालनाला कुलूप घातले. यावेळी विविध कामासाठी जिल्हाभरातून
आलेल्या मुख्याध्यापक व शिक्षकांची मोठी गर्दी शिक्षणाधिकारी कार्यालयात होती. कुलूपघातल्याची
माहिती मिळताच दुपारपासून कार्यालयाबाहेर असलेलेये माध्यमिक शिक्षणाधिकारी जगताप हे तातडीने कार्यालयात आले.
त्यावेळी जगताप व मल्लिकार्जुन पाटील यांच्यात शाब्दिक खडाजंगी झाली. दरम्यान याचवेळी शिक्षण
विभागातील वरिष्ठांची व्हीसी बैठक सुरू झाल्याने शिक्षणाधिकारी जगताप त्यात व्यस्त राहिले. रात्री उशिराने जगताप व पाटील यांच्यात चर्चा झाली. रखडलेली कामे मार्गी लावण्याचे आश्वासन शिक्षणाधिकारी जगताप यांनी पाटील यांना दिले.
दरम्यान, माध्यमिक शिक्षण विभागात शिक्षकांची व संस्थांची कामे वेळेवर होत नाहीत. शिक्षक मान्यतेचे प्रस्ताव, सह्यांच्या अधिकार व पेन्शनबाबतचे प्रस्तावमुद्दामहून जाणूनबुजून अडवून ठेवले जातात. याला शिक्षणाधिकाऱ्यांसह कार्यालयातील सर्वच कर्मचारी जबाबदार असल्याचा आरोप पाटील यांनी केला आहे. माध्यमिक शिक्षण विभागात दिवसभर थांबूनही शिक्षणाधिकारी भेटत नाहीत. संस्थाचालक, मुख्याध्यापक व शिक्षकांना वेठीस धरले जाते. दूरवरून आलेले लोक दिवसभर उपाशीतापाशी बसून असतात. परंतु शिक्षण विभागातील अधिकारी, कर्मचाऱ्यांना याची कीव येत नाही, अशी संतापजनक
भावना पाटील यांनी पत्रकारांसमोर व्यक्त केली.
 चौकट १ 
न्यायालयीन कामात व्यस्त
सोमवारी दुपारपर्यंत मी कार्यालयातच होतो. दुपारनंतर मात्र आपण न्यायालयीन कामासाठी न्यायालयात होतो. तेथील कामे आटोपून उशिराने कार्यालयात आलो. मात्र, आपल्या दालनाला कुलूप लावल्याचे माहीत नाही. मी कुणाचेही काम अडविले नाही. न्यायालयीन कामाला प्राधान्य देण्याचे शासनाचेच आदेश आहेत. त्याचे मी पालन केले आहे. आता रात्री उशिरापर्यंत भेटीसाठी थांबलेल्या सर्वांचेच म्हणणे ऐकून घेतो, असे शिक्षणाधिकारी सचिन जगताप यांनी सांगितले.
Reactions

Post a Comment

0 Comments