पंढरपूर (कटूसत्य वृत्त):- विधानसभेचे पावसाळी अधिवेशन सोमवारपासून सुरू झाले असून पहिल्याच दिवशी विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी तालिका अध्यक्षांची घोषणा केली असून यामध्ये पंढरपूर मंगळवेढ्याचे आमदार समाधान आवताडे व माढ्याचे आमदार अभिजित पाटील यांना संधी देण्यात आली आहे.
विधानसभा अध्यक्षांच्या अनुपस्थितीमध्ये सभागृहाचे कामकाज तालिका अध्यक्ष चालवत असतात. आवताडे हे दुसऱ्यांदा पंढरपूर विधानसभा मतदारसंघातून विजयी झाले आहेत तर पाटील हे पहिल्यांदाच
माढा मतदारसंघातून आमदार झाले आहेत. या दोन तरुण आमदारांना तालिका अध्यक्षांच्या यादीत स्थान मिळाले आहे. सोमवारी विधानसभेचे कामकाज सुरू झाल्यानंतर अध्यक्ष नार्वेकर यांनी तालिका अध्यक्षांची यादी जाहीर केली. आमदार आवताडे व आमदार पाटील हे दोघेही सोलापूर जिल्ह्यातील असून त्यांचे मतदारसंघ शेजारी-शेजारी आहेत. पाटील हे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे तर आवताडे हे भाजपचे आमदार आहेत.
0 Comments