Hot Posts

6/recent/ticker-posts

आगाऊ आरक्षण केल्यास तिकीट दरामध्ये १५ टक्के सूट

 आगाऊ आरक्षण केल्यास  तिकीट दरामध्ये १५ टक्के सूट
एसटी महामंळाची आजपासून योजना 
सोलापूर (कटूसत्य वृत्त):-
एसटीच्या लांब व मध्यम पल्ल्याच्या प्रवासासाठी आगाऊ आरक्षण करणाऱ्या पूर्ण तिकीटधारी
(सवलतधारक प्रवासी वगळून) प्रवाशांना तिकीट दरात १५ टक्के सवलत दिली जाणार आहे.
ही योजना दिवाळी व उन्हाळी सुट्टीचा गर्दीचा हंगाम वगळता वर्षभर सुरू राहणार आहे. या
संमिश्र येणार आहे. राज्यभरातून पंढरपूर येथे जाणाऱ्या नियमित बसेसचे आरक्षण प्रवाशांनी केल्यास योजनेची सुरुवात मंगळवार, १ जुलैपासून करण्यात येत असल्याचे परिवहनमंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी म्हटले आहे.
एसटीच्या ७७ व्या वर्धापन दिन कार्यक्रमात सरनाईक यांनी कमी गर्दीच्या हंगामामध्ये लांब पल्ल्याच्या बसमधून प्रवास करणाऱ्या प्रवाशांनी आगाऊ आरक्षण केल्यास त्यांच्या तिकिटामध्ये १५ टक्के सूट
देण्याची घोषणा केली होती. त्यानुसार ही योजना सर्व प्रकारच्या बससाठी १ जुलैपासून लागू करण्यात येत आहे. अर्थात ही योजना पूर्ण तिकीट काढणाऱ्या प्रवाशांसाठीच लागू राहणार आहे. येत्या आषाढी एकादशीला व गणपती उत्सवासाठी आगाऊ आरक्षण करणाऱ्या प्रवाशांना या योजनेचा लाभ घेता
त्यांना त्यांच्या तिकीटदरात १५ टक्के सवलत मिळणार आहे. तथापि, जादा बसेससाठी ही सवलत लागू असणार नाही. तसेच गणपती उत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या चाकरमानी प्रवाशांनादेखील आगाऊ आरक्षण केल्यानंतर या तिकिटाचा लाभ घेता येईल. मुंबई-पुणे मार्गावर धावणाऱ्या एसटीच्या प्रतिष्ठित ई-शिवनेरी बसमधील प्रवाशांना या योजनेचा जास्तीत जास्त लाभ घेता येईल.
Reactions

Post a Comment

0 Comments