Hot Posts

6/recent/ticker-posts

चरणसेवा उपक्रमावर वारकरी बांधव खुश, भाविकांनी मानले शासनाचे आभार

 चरणसेवा उपक्रमावर वारकरी बांधव खुश, भाविकांनी मानले शासनाचे आभार



सोलापूर (कटूसत्य वृत्त):- संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्यात धर्मपुरी येथे फुट मसाज ची चरणसेव्चा शुभारंभ ग्रामविकास व पंचायतराज मंत्री जयकुमार गोरे यांचे हस्ते करणेत आला.
संत ज्ञानेश्वर महाराज पालखी मार्गावर उभारणेत आलेल्या चरणसेवा केंद्रातील वारकरी बांधव यांचेशी पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी संवाद साधला. स्वयंचलित फुट मसाज मुळे चालून चालून थकलेले पायांना आराम मिळत असलेने या सेवेवर वारकरी जाम खुश आहेत.
जिल्हा परिषदेचे सिईओ कुलदीप जंगम यांनी सर्वाधिक फुट मसाजवर वारकरी यांचे साठी वेळेत उपलब्ध करून दिले आहेत. धर्मपुरी, कारूंडे बंगला , शिंगणापूर फाटा, तसेच सर्व मुख्यमंत्री सहाय्यता निवारा कक्षात हे फुट मसाजर बसविणेत आले आहेत. या सर्व केंद्राचा मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम व अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप कोहिणकर यांनी भेट देऊन वारकरी यांचेशी संवाद साधला. सिईओ कुलदीप जंगम यांचे मार्गदर्शना खाली जिल्हा परिषदेच्या उप मुख्य कार्यकारी अधिकारी स्मिता पाटील  त्यांचे टीम ने लक्ष घालून कमी कालावधीत मोहिम पध्दतीने चरण सेवा साठी फुट मसाजर उपलब्ध करून दिले आहेत. प्रशिक्षणासह १५० पेक्षा अधिक कर्मचारी या चरणसेवा साठी तैनात करणेत आले आहेत.

चरणेसेवे साठी रांगा
आळंदी ते धर्मपुरी १४० किमीचा पायी प्रवास करून थकलेले पाय मशीन द्वारे दाबून घेणे साठी रांगा लागले आहेत.
महिला साठी स्वतंत्र कक्ष करणेत आलेला आहे.
वृध्द भाविकांची चरण सेवे साठी झुंबड उडाली आहे. विशेष ती महिला भाविकांची संख्या अधिक आहे. बंदोबस्त साठी आलेले पोलिस कर्मचारी व अधिकारी देखील या चरणसेवेचा लाभ घेत आहेत. या चरण सेवेसाठी कक्ष अधिकारी अविनाश गोडसे व कक्ष अधिकारी झेड ए शेख यांनी विशेष प्रयत्न केले आहेत.
Reactions

Post a Comment

0 Comments