शिक्षकांनी अध्यापनात नविन तंञज्ञानाचा वापर करावा- दिगबर काळे
माढा (कटूसत्य वृत्त):- सध्याच्या काळात शिक्षकांनी अध्यापनात नवनविन तंञज्ञानाचा वापर करुन अध्यापन करावे. आपण जो व्यवसाय पेशा स्वीकारला त्याच्याशी प्रामाणिक राहून त्याला वेगळ्या उंचीवर नेऊन प्रामाणिकपणे केलेले काम नक्कीच यशस्वी होते. सकारात्मक राहून बदल स्वीकारला तर आपले उद्दिष्ट साध्य होते शिक्षक बदलला तर शिक्षण बदलेल शिक्षण बदलले तर समाज बदलेल यासाठी आखावी व रेखीव काम करा. जीवन समृद्ध होईल. आपल्या व्यवसायाचा गुणात्मक दर्जा सुधारला तर नवनिर्मिती करणारी पिढी घडेल असे मत उपळाई बुद्रुक केंद्राच्या शिक्षण परिषदेत केंद्रप्रमुख दिगंबर काळे यांनी म्हटले आहे.चालू शैक्षणिक वर्षाची पहिली शिक्षण परिषद श्री.नंदिकेश्वर विद्यालय उपळाई बु येथे नुकतीच पार पडली.त्यावेळी ते बोलत होते.वडाचीवाडी येथील पा.व.शिंदे यांनी शिक्षण परिषदेमध्ये शिक्षकांना शैक्षणिक धोरणे, अभ्यासक्रम शैक्षणिक प्रगतीचा अभ्यास , प्राप्त माहितीचे विश्लेषण यावर सखोल मार्गदर्शन केले.प्रशासकीय बाबी व विनोबा अॕपविषयी धानाजी घाडगे यांनी मुद्देसूदपणे आपले विचार मांडले.याशिवाय बंडू भोरे
नानासाहेब ढेरे, सकिना आतार, बंडू भोरे, प्रगती पाटील, धनाजी घाडगे यांनी उत्कृष्ट व उपयुक्त मार्गदर्शन केले
प्रथम क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन दशरथ देशमुख व मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले प्रास्ताविक व सूत्र संचालन शहाजी क्षीरसागर यांनी केले तर आभार पांडुरंग शिंदे यांनी मानले,यावेळी केंद्रातील सर्व शिक्षक उपस्थित होते.
0 Comments