Hot Posts

6/recent/ticker-posts

दहा हजाराची लाच मागणाऱ्या महावितरणच्या सहाय्यक अभियंत्यास अटक

 दहा हजाराची लाच मागणाऱ्या महावितरणच्या सहाय्यक अभियंत्यास अटक



करमाळा (कटूसत्य वृत्त):- शेत जमिनीत शेती पंपाचे पोल उभारून विद्युत पंपाला कनेक्शन देण्यासाठी दहा हजार रुपयाची लाच मागितलेल्या सहाय्यक अभियंत्याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने ताब्यात घेतले आहे.

दिग्विजय आबासाहेब जाधव, पद- सहाय्यक अभियंता, (वर्ग-२) नेग नेमणूक महाराष्ट्र राज्य विज वितरण कंपनी मर्या. शाखा कार्यालय जेऊर ता. करमाळा जि. सोलापूर असे त्या अभियंत्याचे नाव आहे.

यातील तक्रारदार यांनी त्यांचे आईचे नावे असलेल्या शेत जमीनीमध्ये शेती पंपाचे विद्युत कनेक्शन मिळणेकरीता महावितरण कार्यालय जेऊर येथे अर्ज / प्रतिज्ञापत्र सादर केले होते. त्याचा पाठपुरावा हे तक्रारदार करत होते.

तक्रारदार यांचे आईचे नावे असलेली शेती जमीन मध्ये शेती पंपाचे विद्युत कनेक्शन करीता महावितरण कार्यालय जेऊर यांचेकडून विद्युत पोलची उभारणी करुन विद्युत कनेक्शन देण्याकरीता दिग्विजय आबासाहेब जाधव, पद सहाय्यक अभियंता, यांनी तक्रारदार यांचेकडे १०,००० रुपये लाचेची मागणी करुन सदरची लाच रक्कम स्वीकारण्याची संमती दिल्यावरुन लाच मागणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सदरची कारवाई उमाकांत महाडिक, तत्कालीन पोलीस निरीक्षक, एसीबी, सोलापूर. पोलीस अंमलदार शिरिषकुमार सोनवणे, अतुल घाडगे, सलिम मुल्ला, स्वामीराव जाधव, राहुल गायकवाड सर्व नेम. ला.प्र.वि., सोलापूर यांनी यशस्वीरित्या पार पाडली आहे.
Reactions

Post a Comment

0 Comments