इथं माणसं अपघातात मरतात, तरी...; प्रणिती शिंदे थेट हायवेवर पोहोचल्या आणि अधिकाऱ्यांना धारेवर धरलं
सोलापूर (कटूसत्य वृत्त):- सोलापूर विजयपूर महामार्गावर असलेल्या नंदूर गावजवळ शुक्रवारी सायंकाळी अपघात झाला होता.सचिन पंडित जवळकोटे (वय 54 वर्ष रा नंदूर,ता दक्षिण सोलापूर) दुचाकीवरून जाणाऱ्या शेतकऱ्याला आयशर या जड वाहतूक करणाऱ्या वाहनाने धडक दिली.
सचिन जवळकोटे यांचा जागेवरच मृत्यू झाला होता. वांगी व नंदूर गावच्या ग्रामस्थांनी संताप व्यक्त करत रास्ता रोको आंदोलनास सुरुवात केली. महामार्गाच्या अधिकऱ्यांना अंडर ब्रिज करा अशी मागणी करताना देखील मागणी काम केले जात नाही. त्यामुळे शेतकऱ्यांनी रास्ता रोको आंदोलन केले.
आंदोलकांनी घटनास्थळवरून थेट खा.प्रणिती शिंदेंना कॉल करून बोलावून घेतले. जवळपास दोन तास रास्ता रोको आंदोलन सुरू होते. खासदार प्रणिती शिंदेंनी घटनास्थळी जाऊन महामार्गाच्या अधिकाऱ्यांना फोन करून झापले. खा.प्रणिती शिंदेंच्या मध्यस्थीने दोन तासांनंतर ग्रामस्थांनी आंदोलन मागे घेतले. दोन तास रास्ता रोको केल्याने सोलापूर विजयपूर महामार्गावर वाहतूक ठप्प झाली होती.
शिंदेंचा संतप्त सवाल
महामार्गावरून ग्रामस्थांना जाण्यासाठी जोपर्यंत अंडरब्रीज करत नाही तोपर्यंत उठणार नाही, अशी भूमिका ग्रामस्थांनी घेतली होती. प्रणिती शिंदे या नान्नज येथील एका कार्यक्रमात होत्या. रास्ता रोको करून आंदोलकांनी शिंदेंना तुम्ही या, अशी मागणी केल्याने पोलीस अधिकारी बुचकळ्यात पडले होते. साडेसात वाजण्याच्या सुमारास प्रणिती शिंदेंनी सोलापूर विजयपूर महामार्गावर अपघात झालेल्या ठिकाणी जाऊन आंदोलकांशी चर्चा केली. महामार्ग प्राधिकरणच्या अधिकाऱ्यांना फोन करून अंडर ब्रिज कधी बांधणार आहेत, असा संतप्त सवाल केला. इथं माणसं मरत आहेत, तुम्ही कारणं सांगू नका. योग्य मोबदला देत भुसंपादन करा आणि लवकरात लवकर अंडर ब्रीज करा, आणखी किती जणांचे बळी घेणार अशा संतप्त शब्दांत प्रणिती शिंदेंनी खडे बोल सुनावले.
सचिनच्या मृत्यूने सोलापूर विजयपूर महामार्ग दोन तास ठप्प
सचिन जवळकोटे(वय 54) हे शेतकरी दुचाकीवरून जाताना हतुर फाट्या जवळ हा अपघात घडला.जाग्यावरच त्यांचा मृत्यू झाल्याने रास्ता रोको आंदोलन झाले .जवळपास दोन तास वाहतूक ठप्प झाली होती.खा प्रणिती शिंदें यांच्या मध्यस्थीने आंदोलन मागे घेण्यात आले.
0 Comments