आषाढीसाठी सोलापूर झेडपी प्रशासन लागले कामाला - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Monday, June 2, 2025

आषाढीसाठी सोलापूर झेडपी प्रशासन लागले कामाला

 आषाढीसाठी सोलापूर झेडपी प्रशासन लागले कामाला



सोलापूर (कटूसत्य वृत्त):- आषाढी यात्रा कालावधीत संताच्या पालखी मार्गावरील ग्रामपंचायती मधील कामे वेळेत संपवा. पावसाची स्थिती लक्षात घेऊन वारकरी यांना सेवा द्या. त्या दृष्ट्रीने वारीचे नियोजन करा, अशा स्पष्ट सुचना जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम यांनी दिल्या.

पंढरपूर पंचायत समिती येथे पालखी मार्गावरील ग्रामपंचायतीच्या ग्रामसेवक व विभाग प्रमुख यांचे बैठकीचे आयोजन करणेत आले होते. या प्रसंगी महाराणा प्रताप यांचे जयंती निमित्त प्रतिमेचे पूजन सिईओ कुलदीप जंगम यांचे हस्ते करणेत आले.

या प्रसंगी अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप कोहिणकर, उप मुख्य कार्यकारी अधिकारी स्मिता पाटील, उप मुख्य कार्यकारी अधिकारी अमोल जाधव, कार्यकारी अभियंता संजय धनशेट्टी, पंढरपूर पंचायत समितीचे गटविकास अधिकारी सुशील संसारे यांचे सब विभाग प्रमुख उपस्थित होते.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages