Hot Posts

6/recent/ticker-posts

सरकारी कामात अडथळा केल्याप्रकरणी आरोपीचा अटकपूर्व जामीन मंजूर

 सरकारी कामात अडथळा केल्याप्रकरणी आरोपीचा अटकपूर्व जामीन मंजूर


सोलापूर (कटूसत्य वृत्त):- सरकारी कामात अडथळा केल्याप्रकरणी आरोपीचा अटकपूर्व जामीन मंजूर यात हकीकत अशी की, दि. १३/०५/२०२५ रोजी रात्रौ ११.३० वा चे सुमारास सदर परीसरातील राहणारे आरोपी नामे नितीन बबलू पंजाबी व त्यांचे इतर साथीदार यांनी सर्वांनी संगणमत करून व बेकायदेशीर जमाव करून हे सर्वजण एमएसईबीचे शासकीय ऑफिस प्लॉट नं १६ जिजामाता नगर स्वागत नगर रोड, सोलापुर येथे येवुन "मागील चार तासापासुन आमच्या परीसरातील लाईट गेलेली आहे तुम्ही काय करता, तुम्हाला दिवसा काम करुन घेता येत नाही का?" असे म्हणुन शिवीगाळ करून लागले व फिर्यादीचे अंगावर धावून फिर्यादी करत असलेल्या शासकीय कामात अडथळा निर्माण केला. त्यानंतर त्यांना मेन लाईन बंद झाली आहेती चालु झाली की सर्व लाईट चालू होईल असे सांगत असताना परत सर्वानी मिळुन फिर्यादीला शिवीगाळ करीत दमदाटी करु लागले व त्यांचे पैकी कोणतरी फिर्यादीच्या हातातील ऑफिसचा मोबाईल घेवुन फेकुन दिला व ऑफिसमधील कॉप्युटर, सीसीटीव्ही कॅमेरा, लाकडी सीडी, खिडकी, प्लॉस्टिक खुर्च्या, प्रिंटर, पाण्याचे जार हे सर्व फोडुन तोडुन नुकसान केले व फिर्यादी करीत असलेल्या शासकीय कामात अडथळा निर्माण केला आहे. या प्रकरणात भारतीय न्याय संहिता (BNS), २०२३ अंतर्गत कलम १३२, १८९(२), १९०, १९१(२), १९१(३), ३२४(४), ३५१ (२), ३५२ अन्वये MIDC पोलीस स्टेशन येथे गुन्हा नोंदविण्यात आला होता.

सदर आरोपीने अॅड. विशाल मस्के मार्फत मे. जिल्हा व सत्र न्यायालय, सोलापूर येथे जामीन अर्ज दाखल केला होता. जिल्हा व सत्र न्यायाधीश आर. जे. कटारिया यांनी यातील आरोपी नामे नितीन बबलू पंजाबी यांना सशर्त अटकपूर्व जामीन मंजूर केला आहे. या प्रकरणात आरोपींच्या वतीने अॅड. विशाल मस्के, अॅड. स्वाती मस्के यांनी काम पाहिले, तर सरकारतर्फे अॅड. कुलकर्णी यांनी बाजू मांडली.
Reactions

Post a Comment

0 Comments