जिजाऊ ज्ञान मंदिर कोंडी येथे छत्रपती राजर्षी शाहू महाराज जयंती उत्साहात - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Friday, June 27, 2025

जिजाऊ ज्ञान मंदिर कोंडी येथे छत्रपती राजर्षी शाहू महाराज जयंती उत्साहात

 जिजाऊ ज्ञान मंदिर कोंडी येथे छत्रपती राजर्षी शाहू महाराज जयंती उत्साहात



कोंडी (कटूसत्य वृत्त):- जाणता राजा बहुउद्देशीय शिक्षण प्रसारक मंडळ कोंडी संचलित जिजाऊ ज्ञान मंदिर संकुलामध्ये आरक्षणाचे जनक राजर्षी छत्रपती शाहू महाराज जयंती उत्साही वातावरणात साजरा करण्यात आली.
प्रशालेतील चिमुकल्या बालकांनी इंग्रजी मधून छत्रपती शाहू महाराजांचे विचार प्रकट करण्याचा प्रयत्न केला. छत्रपती शाहू महाराजांच्या प्रतिमेला अभिवादन सर्व शिक्षक आणि विद्यार्थ्यांनी केले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्याध्यापिका अर्चना औरादे यांनी केले.
अमय देशमुख यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.

कार्यक्रमाच्या अध्यक्षीय भाषणामध्ये संस्थापक अध्यक्ष गणेश  नीळ म्हणाले,  छत्रपती राजर्षी शाहू महाराज यांचे विचार अतिशय आदर्श आणि प्रेरणादायी होते.
शेतकरी कष्टकरी जगला पाहिजे यासाठी त्यांनी राधानगरी धरण निर्माण केले आणि त्यामुळेच खऱ्या अर्थाने या देशांमध्ये राज्यांमध्ये हरितक्रांतीचे जनक म्हणून त्यांची ओळख निर्माण झाली.
एवढेच नव्हे तर आरक्षणाचे जनक म्हणूनही त्यांचीच ओळख सबंध देशाला आजही आहे.
अशा या महान ऋषितुल्य व्यक्तिमत्त्वाला त्रिवार मानाचा मुजरा करण्याबरोबरच शाहू महाराजांचे शिक्षण, कृषी, औद्योगिक आणि सामाजिक क्षेत्रातील मोलाचे योगदान आपल्याला कायम दिशादर्शक आणि मोलाचे ठरेल असे शेवटी बोलताना गणेश निळसर यांनी सांगितले.
यावेळी दादासाहेब नीळ यांनी छत्रपती शाहू महाराजांच्या कार्याला मराठी मधून उजाळा दिला. आणि छत्रपती शाहू महाराज हे लोककल्याणकारी राजे कसे झाले.
हा विद्यार्थ्यांनी आदर्श घ्यावे असे सांगितले.

कार्यक्रमाचे उत्कृष्ट सूत्रसंचालन किरण वाडीकर यांनी केले तर कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन मुख्याध्यापक वैभव मसलकर यांनी केले.
या कार्यक्रमासाठी सर्व शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages