ड्रेनेज लाईन कामामुळे पावसाळ्यात साचणाऱ्या पाण्याचा निचरा होण्यास मदत होईल-किसन जाधव - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Friday, June 27, 2025

ड्रेनेज लाईन कामामुळे पावसाळ्यात साचणाऱ्या पाण्याचा निचरा होण्यास मदत होईल-किसन जाधव

 ड्रेनेज लाईन कामामुळे पावसाळ्यात साचणाऱ्या पाण्याचा निचरा होण्यास मदत होईल-किसन जाधव




सोलापूर (कटूसत्य वृत्त):- सोलापूर महानगरपालिका प्रभाग क्रमांक २२ मधील धोंडीबा वस्ती येथे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे नागरी वस्ती सुधारणा योजनेअंतर्गत सन २०२४-२५ राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेशाध्यक्ष तथा खासदार सुनील तटकरे यांच्या विशेष सहकार्यातून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेश उपाध्यक्ष किसन जाधव आणि कार्यसम्राट नगरसेवक नागेश गायकवाड यांच्या प्रयत्नातून २४ लाख ७५ हजार १०९रुपये खर्चून नवीन ड्रेनेज लाईन कामाचे शुभारंभ करण्यात आले. प्रभाग क्रमांक २२ मधील विकास कामांचा एक भाग म्हणून धोंडीबा वस्ती येथील नवीन ड्रेनेज लाईन टाकण्यात येत आहे या कामामुळे या भागातील नागरिकांची अनेक वर्षापासून ची ड्रेनेजची समस्या दूर होणार आहे या ड्रेनेज लाईन कामामुळे पावसाळ्यात साचणारा पाण्याचा निचरा होण्यास मदत होईल आणि परिसरातील स्वच्छता आणि आरोग्य अबाधित राहील हे काम प्रभागाच्या विकास कामांचा एक भाग आहे असे मनोगत यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेश उपाध्यक्ष किसन जाधव यांनी व्यक्त केली. दरम्यान या ड्रेनेज लाईन शुभारंभ प्रसंगी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते विधिवत पूजन होऊन या कामाचे शुभारंभ करण्यात आले यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेश युवक सरचिटणीस चेतन नागेश गायकवाड,दशरथ जाधव,समीर उर्फ सिकंदर शेख, राजू ब्रदर जाधव, श्याम जाधव, ताज ग्रुपचे महंमद बिल्डर शेख,युसुफ शेख, शंकर लोखंडे, बादशाह शेख, आलम शेख, पांडू दोडमणी, सोहेल जवळगी, मल्लू साखरे,अब्दुल शेख, लक्ष्मीकांत चलवादी, धर्मा फुलारी, अंबादास मैंदर्गीकर, अंकुश गायकवाड,धर्मा गायकवाड, आशिष गायकवाड, अमोल शेख, अनिल राठोड, डेविड काळे, अंकुश गायकवाड, गंगुताई साखरे, हुलगम्मा साखरे, नीलाताई चलवादे, प्रिया गायकवाड, किरण गायकवाड, श्वेता गायकवाड,नसिमा शेख, लक्ष्मीबाई कट्टीमनी, शीला नडगिरे, निकिता जाधव, विमल जाधव, सिद्धवार तळभंडारे, अनिता भोई, रंजना चलवादी यांच्यासह प्रभागातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. दरम्यान कार्यसम्राट नगरसेवक नागेश गायकवाड आणि किसन जाधव यांनी प्रभागाच्या नागरिकांच्या मूलभूत सुविधांसाठी हे नेहमी तत्पर असतात नागरिकांना चांगल्या आणि दर्जेदार सुविधा मिळाव्या यासाठी त्यांचे प्रयत्न देखील असतात त्यांच्या नेतृत्वाखाली प्रभाग २२ चा सर्वांगीण विकास झाल्याचे यावेळी येथील स्थानिक नागरिक आणि महिलांनी आपले मनोगत व्यक्त करत किसन जाधव आणि नागेश गायकवाड यांचे या नवीन ड्रेनेज लाईन कामाच्या शुभारंभ प्रसंगी आभार मानले.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages