नीरज उबाळे यांनी पोलीस निरीक्षक पदाचा कार्यभार स्वीकारला - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Friday, June 27, 2025

नीरज उबाळे यांनी पोलीस निरीक्षक पदाचा कार्यभार स्वीकारला

 नीरज उबाळे यांनी पोलीस निरीक्षक पदाचा कार्यभार स्वीकारला



अकलूज (कटूसत्य वृत्त):- अकलूज पोलीस स्टेशनच्या पोलिस निरीक्षक नीरज उबाळे यांनी पदभार स्वीकारल्यानंतर पत्रकारांशी वार्तालाप करताना म्हणाले संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्याचे आगमन काही दिवसात माळशिरस तालुक्यात होत आहे.त्यासाठी योग्य ते नियोजन करण्यात आले आहे.तसेच कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी आपन कटिबद्ध असल्याचे त्यांनी सांगितले.
           निरज उबाळे यांनी पोलीस खात्यामध्ये विविध पदांवर काम केलेले आहे.त्यामध्ये गुन्हे अन्वेषण आणि भ्रष्टाचार विरोधी कारवाईचा व्यापक अनुभव आहे.यापूर्वी त्यांनी पुणे व मुंबई येथे अँटी करप्शन ब्युरो आणि क्राईम ब्रँचसारख्या महत्वाच्या विभागांमध्ये काम पाहिले असून, सांगली येथे सहाय्यक पोलीस निरीक्षक म्हणूनही त्यांनी जबाबदारीने पार पाडली आहे.


चौकट
"वारीच्या पार्श्वभूमीवर पोलिस यंत्रणा सज्ज असून,कुठल्याही प्रकारचा अनुचित घडू नये यासाठी दक्षता घेतली जात आहे.तसेच नागरिकांनी पोलीस खात्यास सहकार्य करावे,"असे आवाहन उबाळे यांनी यावेळी केले.संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्याच्या काळात पोलीस यंत्रणा अधिक कार्यरत राहणार असून,शांतता आणि सुव्यवस्थेसाठी पोलीस विभाग सज्ज असल्याची ग्वाहीही त्यांनी दिली.

नीरज उबाळे
पोलीस निरीक्षक,
अकलूज पोलीस स्टेशन अकलूज

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages